मुंबई, 25 ऑक्टोबर : टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपती चा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन त्यांच्या KBC शोमुळे चर्चेत असतात. अमिताभ अनेकदा आपल्या शोमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करतात.नुकताच बिग बींनी असा खुलासा केला आहे, जो तुम्ही क्वचितच ऐकला असेल. केबीसीच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट घडली आहे. या शोमधल्या नव्या भागाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. यावेळी अमिताभ यांच्यासमोरील हॉटसीटवर डॉ. समित सेन बसले होते. २८ वर्षीय डॉ. सेन दिल्लीमधील राम मनोहर लोहिया महाविद्यालयामध्ये मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये मास्टर्स करत आहेत. विशेष म्हणजे ‘केबीसी’च्या २२ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवरुन येणारे ते पहिले स्पर्धक आहेत. सगळीकडेच चर्चा होत आहे. हेही वाचा - Nidhi Bhanushali: ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’; तारक मेहताच्या सोनूचा दिवाळी लूक पाहून बसेल धक्का सोनी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर या शोचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन डॉ. सेन यांच्याशी गप्पा मारत असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी “तुम्ही अंदमान-निकोबार बेटांचे प्रतिनिधित्व करणारे पहिले स्पर्धक आहेत”, असे म्हणत डॉ. सेन यांचा सत्कार केला. पुढे अमिताभ यांनी “याबद्दल आता तुम्हाला काय वाटत आहे?” असा सवाल केला. त्याचे उत्तर देताना डॉ. सेन म्हणाले, “ही माझ्या अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. आमच्याकडे पोर्ट ब्लेअरला सर्वजण तुमचा हा कार्यक्रम नेहमी पाहत असतात. मी लहानपणी तुम्ही आमच्या तिथे भेट दिल्याची अफवा ऐकली होती.” त्यावर बच्चन यांनी स्मितहास्य देत “हो. मी एकदा तेथे आलो होतो” असे म्हटले.
स्पर्धकाने पुढे सांगितले की, ‘मी अंदमान आणि निकोबार बेटांशी ओळखतो कारण माझा जन्म तिथे झाला आहे आणि मला राष्ट्रीय टेलिव्हिजनवर आणि ‘KBC’ सारख्या शोमध्ये बेटांचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान आहे. हे खेळणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे, मी तुमच्यासमोर बसून माझ्या गावाबद्दल तुमच्याशी बोलतोय.’ तो पुढे म्हणाला की, मेगास्टारसोबतचा संवाद तो आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. सोनी टिव्ही वाहिनीच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला “डॉ. समित सेनजी तुम्ही फक्त अंदमान आणि निकोबार बेटांची शानच नाही, तर त्यांची प्रेरणा आणि अभिमान देखील आहात”, असे कॅप्शन दिले आहे.