जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KBC 14: स्पर्धकाला देता आलं नाही शिक्षक दिनाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर; 50 लाखांवर सोडलं पाणी

KBC 14: स्पर्धकाला देता आलं नाही शिक्षक दिनाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर; 50 लाखांवर सोडलं पाणी

कौन बनेगा करोडपती 14

कौन बनेगा करोडपती 14

नेहमीप्रमाणे, यावेळीही अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना स्पर्धकाला घाम फुटला 50 लाखांच्या प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. काय होता तो प्रश्न पाहा

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑक्टोबर : टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअ‍ॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चा 14वा सीझन सुरू आहे. ज्यामध्ये अनेक स्पर्धकांनी 50 लाख रुपये जिंकले आहेत. नेहमीप्रमाणे, यावेळीही अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना स्पर्धकाला घाम फुटला आणि त्यांनी शो मध्येच सोडून जाणे निवडले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या  एपिसोडमध्ये सहभागी झालेला स्पर्धक सूरज दास हा हॉटसीटवर बसून प्रश्नांची अगदी सहज उत्तरे देत होता.  त्याने 25 लाखांचा प्रश्न सहज गाठला. पण 50 लाख रुप्याच्या प्रश्नावर तो अडकला.  त्यानंतर त्याला मध्येच शो सोडावा लागला. खरं तर, खेळाच्या या टप्प्यावर पोहोचेपर्यंत सूरजने आपली सर्व लाईफलाईन संपवल्या होत्या. तसेच ५० लाख रुपयांच्या  अचूक उत्तराबद्दल त्याला खात्री नव्हती, म्हणून त्याने 25 लाख रुपये घेऊन हॉटसीट  सोडणेच पसंत केले. हेही वाचा - Bollywood Actors: बिग बी ते कॅटरिना ‘या’ कलाकारांना करिअरमधल्या एका चुकीचा होतो अजूनही पश्चाताप 50 लाखांसाठी काय प्रश्न विचारला होता? शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी ५० लाखांची सूरज दासला विचारण्यात आलेला प्रश्न होता कि, “कोणता देश २४ नोव्हेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करतो. ज्या दिवशी देशाच्या संस्थापकाने मुख्याध्यापक ही पदवी स्वीकारली. या प्रश्नासाठी त्याला दिलेले पर्याय होते A – पाकिस्तान, B – तुर्की, C – फ्रान्स किंवा D – चीन. हे आहे बरोबर उत्तर या कठीण प्रश्नाचे उत्तर होते ऑप्शन बी ‘टर्की.’ पण सूरजला या प्रश्नाच्या उत्तराबद्दल खात्री नव्हती, त्यामुळे त्याने 25 लाखांची रक्कम जिंकून शो सोडला.  हा एपिसोड खूप मनोरंजक होता. यामध्ये स्पर्धक आणि अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपटांबद्दल आणि चित्रपटांशी संबंधित अनेक कथांबद्दल सांगितले.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान  इतर अनेक स्पर्धकांनी देखील  25 लाखांच्या प्रश्नावर गेम सोडला. 21 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये गगनदीप सिंग नावाच्या स्पर्धकाने चांगला खेळ केला, पण तो 25 लाखांच्या प्रश्नावर अडकला. अमिताभ बच्चन यांनी विचारले की रणजी ट्रॉफीमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा अनोखा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर आहे? त्याचे पर्याय A- सौराष्ट्र, B- मुंबई, C- हैदराबाद, D- कर्नाटक होते. बरोबर उत्तर ‘हैदराबाद’ होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात