मुंबई, 8 डिसेंबर : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या शाही लग्नाची (Katrina Kaif Vicky Kaushal Wedding) सर्वत्र चर्चा सुरू आहे. सर्वसामान्य असो की खास, यावेळी सर्वांच्या नजरा कॅट-विक्कीच्या लग्नाकडे लागल्या आहेत. बॉलीवूडच्या या पॉवर कपलच्या लग्नाची माहिती सर्वांना जाणून घ्यायची आहे.कतरिना-विकी कौशलच्या लग्नाची चर्चा बॉलिवूड सेलिब्रिटीही सोशल मीडियावर करत आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने (Kangna Ranaut) देखील या दोघांच्या लग्नाबाबत आपले मत मांडले आहे. कतरिना कैफ विकी कौशलपेक्षा वयाने मोठी आहे. कंगना देखली या जोडप्याच्या वयाच्या अंतरावर बोलली आहे.
कंगनाकडून कतिरनाचे कौतुक
कंगना राणावत तिच्या नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असते. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाबद्दल देखील कंगानाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपली बाजू मांडली आहे. कंगनाने या पोस्टमध्ये कतरिना-विक्कीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही पण हे प्रकरण दोघांच्या लग्नाबाबत असल्याचं पोस्टमधून स्पष्ट झालं आहे. कंगनाने लिहिलं आहे की, 'मोठं झाल्यावर आम्ही अशा अनेक कथा ऐकल्या आहेत, जिथे श्रीमंत माणसांनी स्वतःहून लहान मुलीशी लग्न केलं. एखाद्या मुलीस तिच्या पतीपेक्षा अधिक यशस्वी असण समाज मान्य करत नाहीत. कमी वयाच्या पुरूषाशी लग्न करण्याचा मुद्दा सोडा, पण वयाचा विशिष्ट टप्पा उलटल्यानंतर लग्न करणे अवघड होऊन बसते. भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी महिलाही या रूढींना छेद देत असे पाऊल उचलत आहेत, हे पाहून बरे वाटते.
वाचा : आज कतरिना कैफला लागणार हळद! असा असणार हळदी समारंभ
कतरिना विकीपेक्षा वयाने मोठी
कंगनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे कतरिना सध्या 38 वर्षांची आहे आणि विकी कौशल 33 वर्षांचा आहे. लोकप्रियतेच्या बाबतीतही कतरिना विकीच्या तुलनेत जास्त लोकप्रिय आहे. फिल्म इंडस्ट्रीतही कॅट विकीची सिनियर आहे.
वाचा : कतरिनासाठी विकी कौशलने असा केला होता पहिला Instaपोस्ट; VIDEO होतोय VIRAL
तसे, कतरिना ही पहिली अभिनेत्री नाही जिने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड केली आहे. याआधीही अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींनी आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या मुलांशी लग्न केले आहे. दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांनी देखील एक वर्ष लहान असलेल्या सुनील दत्त यांच्यासोबत लग्न केले. या यादीत प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन, उर्मिला मातोंडकर, बिपाशा बसू, अर्चना पूरण सिंग या अभिनेत्रींचा समावेश आहे.
कॅट-विकीचं लग्न 9 डिसेंबरला
कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. या जोडप्याच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावल्याचे वृत्त आहे. शाही विवाहसोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक स्टार्स आधीच पोहोचले आहेत. 9 डिसेंबरला कतरिना कैफ विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment