कार्तिकने स्टेजवर सर्वांसमक्ष कतरिनाचे पाय धरले; VIDEO पाहून समजेल कारण

कार्तिकने स्टेजवर सर्वांसमक्ष कतरिनाचे पाय धरले; VIDEO पाहून समजेल कारण

स्टेजवर येताच कतरिनाने अशी काही घोषणा केली की, कार्तिकला तिचे पाय धरावे लागले. सोशल मीडियावर हा VIDEO व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मार्च : IIFA अवॉर्डच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आजच्या काळचा तरुण स्टार कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ हजर होते. कार्तिकचा हात मोडल्यामुळे एक छोटी सर्जरी करून थेट तो इव्हेंटला हजर झाला. स्टेजवर येताच कतरिनाने अशी काही घोषणा केली की, कार्तिकला तिचे पाय धरावे लागले. सोशल मीडियावर हा VIDEO व्हायरल झाला आहे.

प्रेस कॉन्फरन्स इव्हेंटसाठी कार्तिकला पोहोचायला उशीर झाला. स्टेजवर कतरिना आणि कार्तिकला बोलावल्यावर पहिल्यांदा माइक हातात घेऊन कतरिनाने चक्क घोषणाच करून टाकली, "आपण पुढे कार्यक्रम सुरू करण्याआधी कार्तिकला तुमची क्षमा मागायची आहे. कारण त्याला इथे पोहोचायला उशीर झाला."  कार्तिकनेही कतरिनाचा टाँट खेळकरपणे घेत स्टेजवर चक्क कतरिनाचे पाय धरले आणि वर उठाबशाही काढू लागला.

 

View this post on Instagram

 

At #iifa2020 #SiddharthKannan #KartikAaryan #katrinakaif

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

"काही दिवसांपूर्वी सूर्यवंशीच्या ट्रेलर लाँचला रणवीर सिंह उशीरा पोहोचला होता. तेव्हा ज्या पद्धतीने माफी मागितली. मी तेच करणार आहे", असं म्हणून कार्तिकने कतरिनाचे पाय धरले. रणवीर सिंहनेही व्यासपीठावरच्या साऱ्यांची माफी मागत पाय धरले होते. सूर्यवंशी या सिनेमात कतरिनाची प्रमुख भूमिका आहे, हे विशेष.

पाहा - दिल्ली हिंसाचारावर रितेश देशमुखचा TikTok Video, असं काही म्हणाला की...

त्यानंतर कतरिना आणि लव-आज कल चा हीरो कार्तिन आर्यन यांनी कार्यक्रम गाजवला. हात बांधलेला असूनदेखील कार्तिकने धमाल डान्स स्टेप्स केल्या.

 

View this post on Instagram

 

#KartikAaryan makes #KatrinaKaif dance to his tunes of Pungi dance #IIFA2020

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अन्य बातम्या

ओळखलं का कोण ते? 'बिग बीं'नी शेअर केला जगासमोर कधीही आला नाही असा फोटो

'...तर आमच्या भावना सर्वांसमक्ष आपल्या श्रीमुखावर उमटविण्यात येतील'

First published: March 5, 2020, 7:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading