Home /News /entertainment /

ओळखलं का कोण ते? 'बिग बीं'नी शेअर केला जगासमोर कधीही आला नाही असा फोटो

ओळखलं का कोण ते? 'बिग बीं'नी शेअर केला जगासमोर कधीही आला नाही असा फोटो

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी इस्टाग्राम अकांउटवर पत्नी जया बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे.

  मुंबई,05 मार्च: बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अभिताभ बच्चन त्यांच्या नव्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. नव्या फिल्ममधून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अमिताभ सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात. समाजातील वेगवेगळ्या घटनांवर ते आपल्या प्रतिक्रियादेखील देतात. अमिताभ आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असतात. नुकताच त्यांनी Instagram वर शेअर केलेल्या फोटोची सर्वत्र चर्चा आहे. जया बच्चन आणि अभिताभ बच्चन यांची जोडी कायमच चर्चेत असते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या Instagram वर आपली पत्नी जया बच्चन यांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अगदी दुर्मिळ आहे.  जया बच्चन यांना कधीही या प्रकारच्या लुकमध्ये चाहत्यांनी पाहिलं नसेल. हा फोटो खूप जुना असून यामध्ये जया बच्चन एका वेगळ्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाल्या आहेत.जया बच्चन स्वामी विवेकानंदाच्या गेटपमध्ये दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला हा फोटो 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट'मध्ये एडिट केलेला आहे. कॅप्शन देत हा फोटो अमिताभ बच्चन यांनी शेअर केला आहे. बंगाली चित्रपट डागरट बाबू या जया बच्चन यांच्या चित्रपटातील फोटो असल्याची माहिती अमिताभ यांनी दिली आहे. हा चित्रपट पूर्ण झालाच नाही. त्यामुळेच तो रिलीज झाला नसल्याचं त्यांनी सांगितल. जया बच्चन या चित्रपटात स्वामी विवेकानंदांचा रोल करत होत्या. त्यावेळचा हा फोटो आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत जया बच्चन यांच्या गेटपचं कौतुक करत आहेत.
  View this post on Instagram

  Jaya .. in film ‘Dagtar Babu’ in Bengali playing Vivekanand .. film could not be completed

  A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

  अमिताभ बच्चन सध्या आपल्या चित्रपटांच्या शूटींगमध्ये बिझी आहे. लवकरच त्याचे 4 चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहेत.'चेहरे','ब्रह्मास्त्र','झुंड' आणि ‘गुलाबो-सिताबो’ हे अमिताभ यांचे चित्रपट आगामी काळात येणार आहेत. अन्य बातम्या मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला...’ दिल्ली हिंसाचारावर रितेश देशमुखचा TikTok Video, असं काही म्हणाला की...
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Jaya bachchan

  पुढील बातम्या