मुंबई, 05 मार्च : अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो नेहमीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आताही त्यानं असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो सर्व धर्मांच्या ऐक्याचा संदेश देताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या दंगल आणि जाळपोळीनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. यासोबतच त्यांनी देशात शांतता ठेवण्याची विनंती सुद्धा केली होती. यावर भाष्य करताना रितेशनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. टीक टॉकवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हिंदू-मुस्लीम एकतेवर एक मेसेज देण्याचा प्रयत्न रितेशनं केला आहे.
स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता अभिनेता
View this post on Instagram
रितेशनं या व्हिडीओमध्ये वापरलेल्या गाण्याच्या लिरिक्स या हिंदू-मुस्लीम ऐक्यावर आधारित आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रितेशनं लिहिलं, ‘हिंदू-मुस्लीम भाई-भाई’ हे गाणं 2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘बैंगिस्तान’ या सिनेमातील आहे. या सिनेमात पुलकीत सम्राट आणि रितेश देशमुखसोबत अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. या सिनेमातील मौला हे गाणं ऋतुराज मोहंती आणि राम संपत यांनी गायलं आहे. हेच गाणं रितेशनं त्याच्या व्हिडीओसाठी वापरलं आहे.
यंदा कर्तव्य आहे! 4 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर बॉलिवूड अभिनेता अडकणार विवाहबंधनात
रितेश देशमुखच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तो लवकरच बागी 3 मध्ये दिसणार आहे. या सिनेमात श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ, अंकिता लोखंडे हे कलाकार दिसणार आहेत. रितेश देशमुख या सिनेमात टायगर श्रॉफच्या भावाची भूमिका साकारत आहे. बागी आणि बागी 2 नंतर या फ्रांचाइजीचा हा तिसरा सिनेमा आहे. याआधी रितेशनं मरजावा यासिनेमात खलनायकी भूमिका साकारली होती. या शिवाय तो नागराज मंजुळेंच्या आगामी सिनेमात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे.
मलायकानं शेअर केली नवी YOGA पोस्ट, एकदा करून पाहा; असा होईल फायदा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Riteish Deshmukh