SHOCKING! 'मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका' कार्तिक आर्यनची पॅपराजीला विनंती

SHOCKING! 'मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका' कार्तिक आर्यनची पॅपराजीला विनंती

कार्तिकनं पॅपराजीला मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका अशी विनंती केली आहे. त्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं की काय अशी शंका सर्वाना येऊ लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या अफेअरची चर्चा मागच्या काही काळापासून सुरू आहे. एवढंच नाही तर हे दोघंही अनेकदा एकमेकांसोबत एकत्र फिरताना दिसतात जेव्हा या दोघांनी 'लव्ह आज कल'च्या सिक्वेलचं शूट सुरू केलं तेव्हा पासून या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यानंतर अनेक ठिकणी हे दोघं एकत्र दिसले. एवढंच नाही तर साराच्या वाढदिवसाला कार्तिक कामातून वेळ काढून तिला भेटायला गेला होता. पण आता कार्तिकनं पॅपराजीला सारासोबत त्याचे फोटो काढू नयेत आणि त्याला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे या दोघांचं ब्रेकअप झालं की काय अशी शंका सर्वांना येऊ लागली आहे.

मुंबई मिररनं प्रिसिद्ध केलेल्या वृत्तानुसार कार्तिक आर्यन म्हणणं आहे की, जेव्हा तो आमि सारा कुठेही बाहेर निघतात. तेव्हा फोटोग्राफर त्यांचे फोटो काढतात. पण आता कार्तिकनं असं न करण्याची विनंती फोटोग्राफर्सना केली आहे. एवढंच नाही तर यामगच कारणही त्यानं स्पष्ट केलं आहे. कार्तिक म्हणतो, मला साराचा बॉयफ्रेंड म्हणून नाही तर माझ्या कामामुळे ओळखलं जावं असं मला वाटतं. त्यामुळे कृपया करुन पॅपराजीनं हे सर्व थांबवायला हवं.

'ती' एकमेव मुलाखत, ज्यात रेखासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलले अमिताभ!

 

View this post on Instagram

 

Happy Birthday Princess @saraalikhan95 ❤️ And Eid Mubarak (this time without the mask )

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

सारा-कार्तिकच्या अफेअरच्या चर्चा 'लव्ह आज कल 2'च्या शूटिंगपासून सुरू झाल्या. त्याआधी करण जौहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सारा अली खाननं कार्तिक आर्यन तिला आवडत असल्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर इम्तियाज अली यांनी त्याच्या सिनेमासाठी या दोघांना साइन केलं आणि या दोघांमधील जवळीक वाढताना दिसली. त्यानंतर या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतरही हे दोघं अनेक ठिकणी एकत्र दिसले.

दीपिका पदुकोणवर आली कपडे विकायची वेळ, वाचा काय आहे कारण

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सारा-कार्तिकचा 'लव्ह आज कल 2' 2020च्या व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. याशिवाय सारा सध्या वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1' रिमेकच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. तर कार्तिकच्या हातात सध्या 'पति पत्नी और वो', 'दोस्ताना 2', 'भूल भुलैया 2'  सारखे सिनेमा आहेत. हे सर्व सिनेमा बॅक टू बॅक रिलीज होणार आहेत. 'पति पत्नी और वो' मध्ये कार्तिकसोबत भूमि पेडणेकर आणि अनन्या पांडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

KBC च्या सोप्या प्रश्नावर टीचर एज्यूकेटर झाली फेल, हॉट सीटवरच कोसळलं रडू

=========================================================

SPECIAL REPORT: ठाण्यातील 'हा' रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

First Published: Oct 12, 2019 09:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading