KBC च्या सोप्या प्रश्नावर टीचर एज्यूकेटर झाली फेल, हॉट सीटवरच कोसळलं रडू

KBC च्या सोप्या प्रश्नावर टीचर एज्यूकेटर झाली फेल, हॉट सीटवरच कोसळलं रडू

केबीसीच्या 10 ऑक्टोबरला झालेल्या एपिसोडमध्ये आलेल्या सुरभी या टीचर एज्युकेटर आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर : टीव्ही शो 'कौन बनेगा करोडपती' सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहेत. क्वीज शो बरोबरच जनरल नॉलेज देणारा शो म्हणून या शोकडे पाहिलं जातं. पण अनेकदा चांगले सुशिक्षित लोकही या कार्यक्रमात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसमोर फेल होताना दिसतात. पण या सीझनमध्ये शिक्षकांनाच सोप्या प्रश्नांची उत्तर देता न येण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं दिसून आलं. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये असंच काहीसं घडलं. हॉट सीटवर बसलेल्या गुजरातच्या सुरभी गुंजन दवे एका सोप्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं KBC मधून बाहेर पडल्या.

केबीसीच्या 10 ऑक्टोबरला झालेल्या एपिसोडमध्ये आलेल्या सुरभी या टीचर एज्युकेटर आहेत. शिक्षकांच्या शिक्षिका असलेल्या सुरभी हॉट सीटवर मात्र एका सोप्या प्रश्नावर फेल झाल्या. इतकंच नाही तर प्रसिद्ध गायिका बेगम अख्तर यांना ओळखण्यातही त्या अयशस्वी ठरल्या आणि त्यासाठी त्यांनी कॉल टू एक्सपर्ट ही लाइफलाइन घेतली. एक्सपर्ट रिचा अनिरुद्ध यांनी दावा केला होता की त्यांना या शोमध्ये येण्याची वेळच येणार नाही मात्र त्यांना अवघ्या 80 हजाराच्या प्रश्नासाठी या शोमध्ये यावं लागलं.

'बॉडी कशी बनते हे कोणलाही सांगू नका', हृतिकचा VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल

या प्रश्नांवर अडकल्या सुरभी

प्रश्न : या फोटोमध्ये दिसत असलेल्या गायिका कोण आहेत?

उत्तर : बेगम अख्तर

प्रश्न : भारतातील या खेळविषयी म्हटलं जात की या खेळाची सुरुवात रथेरा नावाच्या प्राचीन खेळापासून झाली आहे. ( या प्रश्नासाठी सुरभी यांनी 2 लाइफलाइन वापरल्या.)

उत्तर : खो-खो

प्रश्न : खालीलपैकी कोणता धागा झाडाच्या खोडापासून तयार केला जातो?

उत्तर : जूट

'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे अमिताभ-जया यांच्या जीवनातून रेखा झाल्या दूर

या प्रश्नावर सुरभी केबीसीमधून पडल्या बाहेर

प्रश्न : बल्सरमध्ये ठेवण्याआधी पारसी पवित्र अग्नी जवळपास 300 वर्ष या ठिकाणी ठेवण्यात आला होता?

उत्तर : नवसारी

सुरभी यांना विचारण्यात आलेले इतर प्रश्न

प्रश्न : यापैकी कोणत्या दहशदवादी हल्ल्यानंतर NIA ची स्थापना करण्यात आली?

उत्तर : मुंबई हल्ला 2008

प्रश्न : कोणत्या राजानं अश्वमेध यज्ञाच्या वेळी आपल्या पत्नीची सोन्याची मूर्ती स्वतःसोबत ठेवली होती?

उत्तर : राम

प्रश्न : वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सर्वात लहान हाड कुठे असते?

उत्तर : कान

प्रश्न : परंपरेनुसार यातील कोणाची संख्या 24 मानली जाते?

उत्तर : जैन तिर्थांकर

प्रश्न : खालीलपैकी काय मार्केटिंगच्या P पैकी एक P नाही?

उत्तर : PROCESS

प्रश्न : जानेवारी 2019 मध्ये संसदेकडून कोणत्या वर्गाला 10% आरक्षण देणाऱ्या विधेयकाला मंजूरी देण्यात आली?

उत्तर : आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग

प्रश्न : लाल रंगात कोणता रंग मिसळल्यावर गुलाबी रंग तयार होतो?

उत्तर : पांढरा

प्रश्न : सावधान आणि विश्राम या स्थिती केव्हा होतात?

उत्तर : परेडच्या वेळी

प्रश्न : फ्लॅट आणि हाय हील्स खालीलपैकी कशाचा प्रकार आहे?

उत्तर :चप्पल

Rangeela च्या नव्या व्हर्जनच्या Trailer मध्ये दिसल्या नैना गांगुलीचा Hot अदा

शिक्षकांना प्रशिक्षण देतात सुरभी

सुरभी या एक टीचर एज्युकेटर आहेत. त्या डीएड कॉलेज्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतात. सुरभी यांना वाचनाची आवड आहे. त्यांचे पती सांगतात त्या दोघांच्या 17 वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांनी आपल्या पत्नीला सर्वात जास्त वेळा वाचन करताना पाहिलं आहे. सोप्या प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं सुरभी यांना या खेळातून बाहेर पडावं लागलं आणि त्यांना हॉटसीटवरच रडू कोसळलं.

सुरभी सांगतात, त्यांना कुटुंबानं त्यांना सर्वच पातळीवर पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना नवनवीन आव्हानं स्वीकारायला लावली. ते सुरभी यांना खूप पाठिंबा देतात. सुरभी यांच्या सासू शिक्षिका होत्या त्यामुळे सुरभी यांचे पती नेहमीच शिक्षकांपासून दूर राहत असत. पण शेवटी त्यांना पत्नी सुद्धा एक शिक्षिकाच मिळाली.

======================================================================

VIDEO: ड्रग्ज माफियांचा पोलिसांवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

First published: October 11, 2019, 2:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading