'ती' एकमेव मुलाखत, ज्यात रेखासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलले अमिताभ!

'ती' एकमेव मुलाखत, ज्यात रेखासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलले अमिताभ!

आजवर फार कमी वेळा अमिताभ आणि रेखा एकमेकांबद्दल बोलताना दिसले. त्यामुळे त्यांची ही मुलाखत खूप खास मानली जाते.

  • Share this:

मुंबई, 11 ऑक्टोबर :  बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचा आज 77 वा वाढदिवस. आपल्या अभिनयानं संपूर्ण बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या अमिताभ यांचा उत्साह आजही तरुण अभिनेत्यांना लाजवेल असाच आहे. अभिनयसोबत अमिताभ यांचं खासगी जीवन सुद्धा खूप चर्चेत राहिलं. 70 च्या दशकात अमिताभ आणि अभिनेत्री रेखा यांची लव्ह स्टोरी प्रचंड गाजली. 1973 मध्ये जया यांच्याशी लग्न केल्यानंतर काही वर्षांनंतरच रेखा आणि अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली. या दोघांनी 'दो अनजाने' 'मिस्टर नटवरलाल', 'सिलसिला', 'दो अनजाने', 'नमक हराम', 'मुकद्दर का सिकंदर' सारख्या सिनेमात एकत्र काम केलंं. मात्र या दोघांनी मीडियासमोर कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही.

आजवर फार कमी वेळा अमिताभ आणि रेखा एकमेकांबद्दल बोलताना दिसले. रेखा सिमी ग्रेवालला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या अमिताभ यांच्याशी असलेल्या नात्याविषयी बोलल्या होत्या तर दुसरीकडे 1998 मध्ये अमिताभ सुद्धा सिमी ग्रेवालला दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांच्याविषयी पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलले. त्यांची ही मुलाखत खूप खास मानली जाते. या मुलाखतीत अमिताभ रेखा यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नात्याविषयी सांगितलं होतं. जाणून घेऊयात अमिताभ यांनी या मुलाखतीत नेमके काय काय खुलासे केले.

प्रेग्नन्सीविषयी दीपिका पदुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात आणि...

प्रत्येकवेळी तुमच्या आणि रेखा यांच्या अफेअरबद्दल बोललं जातं. असं का होतं आणि लोक अशा गोष्टी का पसरवतात या सिमी यांच्या प्रश्नावर अमिताभ म्हणाले, हे तुम्ही त्याच लोकांना विचारायला हवं जे अशा गोष्टी पसरवत आहेत. या गोष्टी कोण पसरवतं असं विचारल्यावर, मीडियामधूनच हे सर्व पसरवलं जातं आणि जर असं नसेल तर या गोष्टी कोण करत त्या व्यक्तीचं नाव मला समजलं पाहिजे असं उत्तर अमिताभ यांनी दिलं.

'बॉडी कशी बनते हे कोणलाही सांगू नका', हृतिकचा VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल

अमिताभ म्हणाले, रेखा माझ्या सहकलाकार होत्या. आम्ही ज्यावेळी एकत्र काम करत होतो. त्यावेळी आमच्या भेटी होणंं स्वभिविक होतं. पण खरं पाहायला गेलं तर आमच्यात कोणत्याही बाबतीत साम्य नाही. बस्स ही ऐवढीच ही गोष्ट आहे. मागच्या अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांना भेटलेलो नाही. नाही म्हणायला आम्ही एखाद्या अवॉर्ड फंक्शनमध्ये एकमेकांच्या समोर येतो. मागच्या काही वर्षांपासून आम्ही एकत्र काम करणंही बंद केलं आहे त्यामुळे आमची अन्य कोणतीही भेट झालेली नाही.

सिमी यांनी विचारलं की या अफवांचा तुम्हाला कधी त्रास होतो का? या प्रश्नावर अमिताभ म्हणाले, मला या गोष्टीचा अजिबात त्रास होत नाही. असे अनेक आरोप माझ्यावर लावण्यात आले. पण  खरं सांगायचं तर यातील एकही आरोप खरा नाही. काही लोकांनी दावा केला होता की मी रेखा यांच्या सोबत राहत आहे, किंवा मग त्या माझ्या घरी राहायला आल्या आहेत. तर काहींनी असंही सांगितलं होतं की त्यांच्याकडे मी रेखा यांना ज्या घरात ठेवलं आहे त्या घराचे फोटो सुद्धा आहेत.

'त्या' रात्री असं काय झालं ज्यामुळे अमिताभ-जया यांच्या जीवनातून रेखा झाल्या दूर

अमिताभ पुढे सांगतात,अशा गोष्टींमुळे मी का त्रास करुन घेऊ ज्या विनोदापेक्षा जास्त काहीच नाही. ते घर माझं आहे. माझं पूर्ण कुटुंब तिथे राहतं, माझे आजारी असलेले आई-वडील त्या ठिकणी राहतात आणि मी त्यांची काळजी घेतो. या गोष्टी अतिशय संवेदनशील आहे कोणतही सत्य जाणू घेण्याआधी किंवा पडताळून पाहण्याआधी लोकांनी माझ्यावर असे आरोप लावले. मला त्या लोकांना विचारायचं आहे की, तुम्ही कधी रेखा यांच्यासोबत काही चुकीचं करताना प्रत्यक्षात पाहिलं आहे का? त्यांनी आम्हाला असं कधी पाहिलं ज्यामुळे त्यांना अशा गोष्टी बोलण्याचा इशारा मिळाला.

VIDEO : TikTok वर अवतरली 'मधुबाला'; सोशल मीडियावर चाहते घायाळ

======================================================================

VIDEO: ड्रग्ज माफियांचा पोलिसांवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

Published by: Megha Jethe
First published: October 11, 2019, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading