मुंबई, 11 ऑक्टोबर : अभिनेत्री दीपिका पदुकोण बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. पण सध्या तिच्यावर कपडे विकायची वेळ आली आहे. हो दीपिका पदुकोण आता कपडे विकत आहे. जर तुम्ही दीपिकाच्या रेड कार्पेट लुकचे चाहते असाल आणि तिचे ड्रेस तुम्हाला आवडत असतील तर तुम्हीही ते विकत घेऊ शकता. दीपिका तिचे सर्व आवडते ड्रेस विकत आहे. जे तुम्ही तिच्या वेबसाइटवरुन खरेदी करू शकता. दीपिकानं नुकतीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून याची घोषणा केली. यातून अंदाज येऊ शकतो की दीपिकाचे ड्रेस खरेदी करण्यासाठी चाहत्यांनी किती गर्दी केली असेल. KBC च्या सोप्या प्रश्नावर टीचर एज्यूकेटर झाली फेल, हॉट सीटवरच कोसळलं रडू
दीपिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. ज्यात तिनं खुलासा केला की, वेबसाइटवर खरेदीसाठी ठेवलेले तिचे ड्रेस अवघ्या 2 तासात संपले. दीपिकानं 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेनेटल हेल्थ डेला या सेलची घोषणा केली होती. हे कपडे विकून मिळणारी रक्कम मानसिक आजारांशी झगडणाऱ्या लोकांसाठी वापरण्यात येणार असल्याचं दीपिकानं सांगितलं. प्रेग्नन्सीविषयी दीपिका पदुकोण म्हणते, आम्हाला मुलं आवडतात आणि… दीपिका याच्याशी संबंधित एक संस्था सुद्धा चालवते. जिचं नाव आहे, ‘लिव्ह लव्ह लाफ’ (Live Love Laugh) फाउंडेशन आहे. ही संस्था मानसिक आरोग्याशी संबंधित विषयांवर काम करते.
एका नव्या व्हिडीओमध्ये दीपिका सांगते, ‘मला एक फोनकॉल आला ज्याद्वारे मला समजलं की माझा क्लॉसेट अवघ्या 2 तासांत रिकामी झाला. त्यामुळे मी लवकरच नवे ड्रेस विकण्यासाठी उपलब्ध करुन देणार आहे.’ दीपिका नेहमीच मेन्टल हेल्थवर बोलताना दिसते. काही वर्षांपूर्वी तिनंही डिप्रेशनचा सामना केला होता. तिनं मागच्या वर्षीच तिचा हा अनुभव शेअर केला होता. ‘बॉडी कशी बनते हे कोणलाही सांगू नका’, हृतिकचा VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल ================================================================ VIDEO: ड्रग्ज माफियांचा पोलिसांवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी केली मारहाण