मुंबई, 24 मार्च : सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. ज्याचा परिणाम सामान्य माणसांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वांवर पाहायला मिळत आहे. ज्या बॉलिवूड सेलिब्रेटींना त्यांच्या बीझी शेड्यूलमधून काही मिनिटांचा वेळ काढणं शक्य होत नव्हतं ते आता मागच्या काही दिवसांपासून घरीच बसून आहेत. त्यामुळे हे स्टार्स घरीच बसून काही ना काही उद्योग करताना दिसत आहेत. कोणी बागेत काम करत आहे. तर कोणी घरी जेवण बनवताना दिसत आहे. कोणी फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करत आहे तर कोणी स्वतःच्या आवडीचे छंद जोपासत आहे. पण या सर्वांत कतरिना कैफवर मात्र घरातली भांडी घासायची वेळ आहे. कतरिनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
कोरोना व्हायरसमुळे जवळपास सर्वच कलाकारांच्या मेड सुट्टीवर आहेत. बाहेरुन जेवण मागवता येत नसल्यानं ते सुद्धा स्वतःच करावं लागत आहे. पण अशात मेड सुट्टीवर असल्यानं भांडी कोण घासणार हा सुद्धा प्रश्न पण कोणतही काम करण्याची लाज कसली बाळगावी असं म्हणत कतरिना कैफनं तिच्या घरातली भांडी स्वतःच घासायला घेतली. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड स्टार्सनी कमेंट केली आहे. पण अर्जुन कपूरची कमेंट सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.
कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टरांवर आधारित या प्रसिद्ध सिरीजची मोठी मदत
कतरिना कितीही मोठी सेलिब्रेटी असली तरीही ती शक्यतो स्वतःचं काम स्वतः करते. त्यामुळे सध्या कोरोना व्हायरसच्या या होम क्वारंटाईन काळात सुद्धा तिनं स्वतःचं काम स्वतः करण्याला प्राधन्य दिलं आहे. या व्हिडीओवर आलेल्या कमेंटमध्ये तिचे चाहते तिचं कौतुक करताना दिसत आहे. कतरिनाचा जवळचा मित्र अर्जुन कपूरनं मात्र तिची खिल्ली उडवली आहे. कतरिनाच्या या व्हिडीओवर अर्जुननं 2 कमेंट केल्या आहेत.पहिल्या कमेंटमध्ये त्यानं कतरिनाला त्याच्या घरी काम करण्यासाठी बोलवलं आहे. तर दुसऱ्या कमेंटमध्ये त्यानं तिला 'कांताबेन 2.0' असं नाव दिलं आहे. अर्जुनच्या या दोन्ही कमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
जंगलामध्ये थरारक स्टंट करताना दिसणार थलायवा!टेलिव्हिजन डेब्यू आज होणार प्रदर्शित

कतरिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा सूर्यवंशी सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. मात्र सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. या सिनेमात कतरिना आणि अक्षय कुमारची जोडी जवळपास 10 वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार आहे. याशिवाय अभिनेता अजय देवगण आणि रणवीर सिंह या दोघांचाही या सिनेमात स्पेशल अपियरन्स असणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं असून या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
कोरोनामुळे अभिनेत्री अॅमी जॅक्सन घरात बंद, इन्स्टाग्रामवर शेअर केले BOLD फोटो मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.