Home /News /entertainment /

कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टरांवर आधारित या प्रसिद्ध सिरीजची मोठी मदत

कोरोनाला हरवण्यासाठी डॉक्टरांवर आधारित या प्रसिद्ध सिरीजची मोठी मदत

अमेरिकेतील वैद्यकीय अभ्यास आणि डॉक्टरांच्या जीवनावर आधारित Grey’s Anatomy या सीरिजकडून N95 मास्क, ग्लोव्ह्ज आणि गाउन्सची मदत करण्यात येणार आहे.

    मुंबई, 23 मार्च : कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. सर्व स्तरातून येणाऱ्या बातम्या पाहता कोरोना व्हायरसची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जगभरातून अनेक जण या परिस्थितीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातही अनेक उद्योगपतींनी मदतीचा हात पुढे सरसावला आहे. (हे वाचा- जंगलामध्ये थरारक स्टंट करताना दिसणार थलायवा!टेलिव्हिजन डेब्यू आज होणार प्रदर्शित) दरम्यान अमेरिकेतील वैद्यकीय अभ्यास आणि डॉक्टरांच्या जीवनावर आधारित Grey’s Anatomy या सीरिजकडून ग्लोव्ह्ज आणि गाउन्सची मदत करण्यात येणार आहे. ABC   स्टुडिओच्या या सीरिजच्या निर्मात्यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या वस्तूंच्या तुटवडा भासू नये यासाठी या प्रोडक्शनकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एका अमेरिकन रेडिओ चॅनेलशी बोलताना या कार्यक्रमाचे कार्यकारी निर्माता म्हणाले की, त्यांनी स्थानिक अग्निशमन केंद्राला मास्क दान केले. त्यांनी सांगितलं की या सिरीजसाठी आणलेले जवळपास 300 N95 मास्क त्यांच्याकडे साठवलेले होते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे असणाऱ्या ग्लोव्ह्स आणि गाऊन्सचा सुद्धा ते दान करणार आहेत. (हे वाचा- कोरोनामुळे शनाया जवळ बाळगतेय ही अत्यावश्यक गोष्ट, इन्स्टाग्रामवर शेअर केले PHOTO) त्याचप्रमाणे the Good Doctor, Station 19  या सिरीजने सुद्धा अशाप्रकारे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी या काही महत्वाच्या सिरीजने मदतीचा हात पुढे केला आहे. (हे वाचा-भारतीयांसाठी प्रियंका चोप्राने थेट अमेरिकेतून वाजवल्या टाळ्या, VIDEO व्हायरल)
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या