जंगलामध्ये थरारक स्टंट करताना दिसणार थलायवा! रजनीकांत यांचा टेलिव्हिजन डेब्यू आज प्रेक्षकांच्या भेटीला

जंगलामध्ये थरारक स्टंट करताना दिसणार थलायवा! रजनीकांत यांचा टेलिव्हिजन डेब्यू आज प्रेक्षकांच्या भेटीला

सुपरस्टार रजनीकांतच्या फॅन्स ज्या एपिसोडची वाट पाहत होते, तो Into the wild with Bear Grylls चा एपिसोड आज प्रदर्शित होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मार्च : सुपरस्टार रजनीकांतच्या फॅन्स ज्या एपिसोडची वाट पाहत होते, तो Into the wild with Bear Grylls चा एपिसोड आज प्रदर्शित होणार आहे. या शोचा ट्रेलर रजनीकांत यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. भारतामध्ये रजनीकांतचे इतके फॅन्स आहेत, की अक्षरश: अनेक जण त्यांना देवच मानतात. त्यांचा चित्रपट सिनेमागृहामध्ये लागला की तो पाहण्याकरता तुफान गर्दी होते. इतकी की सिनेमागृह सुद्धा कमी पडतात. त्यांची स्टाइलही फार हटके आहे. अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवुड कलाकार त्यांची स्टाइल आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणतात, रजनीकांत करू शकत नाही असं काहीच नाही. हजारो मीम्स सुद्धा त्यावर बनले आहेत.

(हे वाचा-कोरोनामुळे अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सन घरात बंद, इन्स्टाग्रामवर शेअर केले BOLD फोटो)

आपल्या टीव्ही डेब्यूमध्ये सुद्धा हा  69 वर्षांचा अवलिया कलाकार एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ते पाहुन तुम्हालाही एकदाही वाटणार नाही की या माणसाने साठी ओलांडली आहे. ट्रेलर जर सर्वांनी पाहिला तर सर्वांनाच समजेल की बेअर ग्रिल्ससमोरही रजनीकांत यांनी त्यांची ‘रजनी स्टाइल’ सोडली नाही. बेअर ग्रिल्सचा शो ‘इंटू द वाइल्ड विद बेअर ग्रिल्स’ (Into the wild with Bear Grylls) चा एपिसोड आज 8 वाजता डिस्कव्हरी चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भात बेअर ग्रिल्सने सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून रजनीकांतचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. कर्नाटकमधील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये या कार्यक्रमाचं शूटिंग करण्यात आलं आहे.

First published: March 23, 2020, 6:00 PM IST

ताज्या बातम्या