मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Sara Ali Khan-Kartik Aaryan: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सारा-कार्तिक; पडद्यावर करणार 'आशिकी'

Sara Ali Khan-Kartik Aaryan: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकत्र दिसणार सारा-कार्तिक; पडद्यावर करणार 'आशिकी'

सारा-कार्तिक

सारा-कार्तिक

Kartik Aaryan Aashiqui 3: बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक म्हणून सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांना ओळखलं जात होतं. या दोघांच्या जोडीला चाहते प्रचंड पसंत करत होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना नाराज केलं होतं.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 4 फेब्रुवारी- बॉलिवूडमधील सर्वात चर्चित कपल्सपैकी एक म्हणून सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांना ओळखलं जात होतं. या दोघांच्या जोडीला चाहते प्रचंड पसंत करत होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना नाराज केलं होतं. या दोघांनी अनेक कार्यक्रमांमधून अप्रत्यक्षपणे एकमेकांवरील राग व्यक्त केला होता. त्यांनतर सारा आणि कार्तिक पुन्हा कधीच एकत्र दिसणार नाहीत असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता हा अंदाज चुकीचा ठरु शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा आणि कार्तिक लवकरच चित्रपटात झळकणार आहेत.

बॉलिवूडचं गोंडस कपल म्हणून सारा अली खान आणि कार्तिक आर्यनला ओळखलं जात होतं. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकही खूप पसंत करत होते. या दरम्यान साराचे वडील सैफ अली खाननं कार्तिकला चांगला मुलगा असं म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांच्या नात्याला संमती दिली होती. त्यांनतर यांचं नातं दीर्घकाळ टिकणार असं वाटत होतं. परंतु अचानक सारा आणि कार्तिकनं ब्रेकअप करत चाहत्यांना धक्का दिला होता. त्यांनतर ते दोघेही कधीही एकत्र दिसले नाहीत. दरम्यान पहिल्यांदा एका पुरस्कार सोहळ्यात दोघे समोरासमोर आले होते. यावेळी त्यांनी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच एकमेकांशी संवाद साधला होता. त्यामुळे या दोघांचं नाव पुन्हा एकत्र जोडलं जात होतं. सध्या साराचं नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं जात आहे.

हे वाचा:Urmila Matondkar B'day:विवाहित दिग्दर्शकासोबत जोडलं नाव, धर्माच्या भिंती तोडत मराठमोळ्या उर्मिलाने मोहसीनसोबत केलं लग्न, फिल्मी आहे LOVE STORY

चित्रपटात दिसणार एकत्र?

कार्तिक आर्यनने आपला अभिनय आणि क्युट लुकच्या जोरावर तरुणाईला वेड लावलं आहे. कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच 'आशिकी 3' मध्ये आपण मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं सांगत अभिनेत्याने चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. कार्तिकसोबत या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान नव्या रिपोर्ट्सनुसार, कार्तिकसोबत सारा अली खान झळकणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चित्रपटात सरांची वर्णी लागल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.

सारा या चित्रपटात दिसणार की नाही याबाबत सारा किंवा मेकर्सनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. परंतु असं झालं तर सारा आणि कार्तिक ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसतील. ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक मेजवानीच असणार आहे. याआधी सारा आणि कार्तिक लव्ह आज कल 2 मध्ये एकत्र दिसले होते. याच सिनेमाच्या सेटवर दोघे एकेमकांच्या प्रेमात पडले होते.

'आशिकी 3' मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसू करणार आहेत. आणि चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भूषण कुमार यांनी सांभाळली आहे. मात्र चित्रपटाच्या मुख्य नायिकेची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाहीय. यापूर्वीसुद्धा अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली होती.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Kartik aryan, Sara ali khan