मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Shubman Gill: शेवटी सापडलाच! सारासोबत एयरपोर्टवर दिसला शुभमन; खान की तेंडुलकर? तुम्हीच पाहा

Shubman Gill: शेवटी सापडलाच! सारासोबत एयरपोर्टवर दिसला शुभमन; खान की तेंडुलकर? तुम्हीच पाहा

शुभमन गिल

शुभमन गिल

Shubman Gill Love: भारतीय क्रिकेट संघातील तरुण क्रिकेटर शुभमन गिल सध्या तुफान चर्चेत आहे. शुभमन आपल्या व्यावसायिक आणि खाजगी दोन्ही आयुष्यामुळे चर्चेत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 3 फेब्रुवारी- भारतीय क्रिकेट संघातील तरुण क्रिकेटर शुभमन गिल सध्या तुफान चर्चेत आहे. शुभमन आपल्या व्यावसायिक आणि खाजगी दोन्ही आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी क्रिकेटरने भारतविरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात द्विशतक झळकावत सर्वांचंच लक्ष वेधलं होतं. तर पुन्हा एकदा नवा विक्रम करत सर्वांची वाहवाह मिळवली आहे. दरम्यान शुभमन आपल्या लव्हलाईफमुळेसुद्धा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सुरवातीला शुभमनचं नाव क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकरसोबत जोडलं जात होतं. त्यांनतर क्रिकेटरचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत जोडलं जात आहे. त्यामुळे शुभमन नेमकं कोणच्या प्रेमात आहे? याबाबत लोक संभ्रमात आहेत.

सोशल मीडियावर सतत शुभमन गिलच्या नावाची चर्चा सुरु असते. काही लोक क्रिकेटरला सारा तेंडुलकरसोबत पाहू इच्छितात तर काही लोक सारा अली खानसोबत. परंतु शुभमन गिलने आपण नेमकं कोणाला डेट करत आहे याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाहीय. त्यामुळे त्याच्या मनात नेमकं कोण आहे? हे अद्याप कोणालाही समजू शकलेलं नाहीय.मात्र आता शुभमनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो एका सारासोबत दिसून येत आहे. पाहूया ही सारा नेमकी कोण आहे?

(हे वाचा:सारा अली खान की सारा तेंडुलकर?कोणाला डेट करतोय शुभमन गिल?पंजाबी अभिनेत्रीच्या ट्विटमधून खुलासा )

गेल्या काही महिन्यांत बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि शुभमन गिल अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण आज पुन्हा दोघेही एयरपोर्टवर गुपचूप एकत्र वेळ घालवताना दिसले आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.शुभमनला सारा अली खानसोबत पाहून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

तरुण क्रिकेटर शुभमन गिल आता भारताचा आवडता खेळाडू बनला आहे. आपल्या दमदार खेळीने त्याने सर्वांनाच खुश केलं आहे. व्यावसायिक आयुष्यासोबतचे शुभमन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील प्रसिद्धीच्या झोतात राहात आहे. सोशल मीडियावर नुकताच शुभमनचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तो त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड सारा अली खानसोबत दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सारा आणि शुभमन गिल एकत्र बसले आहेत. हा फोटो एयरपोर्टवरील असल्याचं सांगण्यात येत आहे. या दोघांचा हा फोटो समोर आल्यानंतर लोक पुन्हा एकदा संभ्रमात पडले आहेत.

नुकतंच एका यूजरने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो समोर येताच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सारा आणि शुभमन गिल एअरपोर्टवर बसून वेळ घालवताना दिसत आहेत. फोटोमध्ये दोघे एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. सारा-शुभमनचा हा फोटो समोर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या बातम्यांनी जोर पकडला आहे.

First published:

Tags: Cricket, Entertainment, Sara ali khan