मराठमोळी उर्मिला मातोंडकर ही बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे.आज अभिनेत्री आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
उर्मिला मातोंडकरने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त या अभिनेत्रीने तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपला ठसा उमटवला आहे.
'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर सध्या चित्रपटांपासून दूर जात राजकारणात खूप सक्रिय झाली आहे. पण ९० च्या दशकात उर्मिलाने आपल्या अभिनयासोबतच आपल्या डान्सनेही लोकांना वेड लावलं होतं.
बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या उर्मिला मातोंडकरने अनेक चित्रपटात काम केलं. परंतु राम गोपाल वर्माच्या 'रंगीला' चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवलं होतं.
राम गोपाल वर्मासोबत उर्मिला मातोंडकरचं नाव जोडलं जात होतं. परंतु दिग्दर्शक आधीच विवाहित असल्याने त्यांच्या पत्नीने उर्मिलाच्या आयुष्यात अनेक अडचणीत निर्माण केल्या होत्या.
या सर्व प्रकरणानंतर उर्मिलाने आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान मोहसीन अख्तर मीरसोबत लग्नगाठ बांधली आहे.
उर्मिलाचा पती मोहसीन 'लक बाय चान्स'मध्ये झळकला होता. उर्मिला आणि मोहसीन पहिल्यांदा मनीष मल्होत्राची पुतणी रिद्धी मल्होत्राच्या लग्नात भेटले होते. बघताच मोहसीन उर्मिलाच्या प्रेमात पडला होता. त्याने फिल्मी स्टाईलमध्ये अभिनेत्रीला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. त्यांनतर २०१६ मध्ये त्यांनी लग्न केलं आहे.