मुंबई, 29 जानेवारी- बॉलिवूडमधील सध्या आघाडीचा अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनकडे पाहिलं जातं. कार्तिक आर्यनने फारच कमी वेळेत आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. कार्तिकची कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेसृष्टीशी संबंधित नसतानादेखील अभिनेत्याने स्वतःच्या अभिनय कौशल्यावर हा मोठा टप्पा गाठला आहे. सध्या कॉलेज तरुणाईमध्ये कार्तिक आर्यनची चांगलीच क्रेज पाहायला मिळते. कार्तिकने एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देत बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्याचा गोड स्वभाव आणि वागण्यातला साधेपणा त्याच्या चाहत्यांना प्रचंड पसंत पडतो. परंतु फारच कमी लोकांना माहिती असेल की कार्तिक आर्यनला हा स्टारडम सहजासहजी मिळालेला नाहीय. त्यासाठी त्याने प्रचंड कष्ट घेतले आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनचा जन्म मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर याठिकाणी झाला आहे. अभिनेता तसा सुशीक्षीत कुटुंबातील परंतु कुटुंबाची कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नाही. त्याचे वडील एक बालरोग तञ् आहेत. तर कार्तिकची आई एक स्त्रीरोग तज्ञ आहे. कार्तिकला एक बहीणदेखील आहे. आपल्या प्रमाणे आपली मुलंदेखील याच क्षेत्रात कार्यरत व्हावी असं त्याच्या आई वडिलांना वाटतं होतं. कार्तिकच्या बहिणी आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करत एमबीबीएसचं शिक्षणदेखील घेतलं. मात्र कार्तिकच्या मनात काही वेगळंच होतं. त्याला सुरुवातीपासूनचं अभिनेता बनण्याचं वेड होतं. परंतु त्याने जेव्हा-जेव्हा आपल्या मित्रां समोर याबाबत सांगितलं तेव्हा सर्वांनी त्याची चेष्टा मस्करी केली.
कार्तिक आर्यनचा अभिनेता बनण्याचा प्रवास कठीण होता. त्याने सलग तीन वर्षे ऑडिशन दिल्या होत्या. परंतु या ऑडिशनमध्ये कधी त्याला लुक्समुळे तर कधी अनफिट असल्याच्या कारणावरुन नकार देण्यात आला होता. सलग तीन वर्षे रिजेक्शन मिळूनही कार्तिक खचला नव्हता. त्याकाळात धीर न सोडल्यामुळेच आज कार्तिक याठिकाणी आहे.
View this post on Instagram
कार्तिक आर्यनने इंजिअनिरिंग केलं आहे. चित्रपटांच्या ऑडिशन देता याव्या यासाठी कार्तिकने मुंबईच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. कार्तिक आर्यनने मुंबईतील डी वाय पाटील कॉलेजमधून आपलं बी टेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. याचकाळात त्याने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये शिकत असताना दोन तास प्रवास करुन कार्तिक चित्रपटांच्या ऑडिशनसाठी जात असे.अभिनेत्याने काही मुलाखतींमध्ये आपण रेल्वेतून विना तिकीट प्रवास केल्याचा खुलासादेखील केला आहे.
कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची माहिती त्याला फेसबुकवरुन समजली होती. त्यांनतर त्याने ऑडिशन दिली होती. हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नसला तरी कार्तिक आर्यनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कार्तिक आर्यनला खरी ओळख 'सोनू के टिटू कि स्वीटी' या चित्रपटातून मिळाली आहे. या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रचंड पसंत करण्यात आला होता. यानंतर कार्तिक आर्यनने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आगामी काळात कार्तिक आर्यन फ्रेडी, शेहजादा अशा अनेक चित्रपटांमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment, Kartik aryan