मुंबई, 09 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान सध्या त्यांचा आगामी सिनेमा लव्ह आजकलमुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमाची चर्चा तर सोशल मीडियावर होतेच पण सोबतच कार्तिक आणि साराची ऑफस्क्रीन केमिस्ट्री सुद्धा चर्चेत आहे. या सिनेमाचं प्रमोशन जोरदार सुरू आहे. मात्र नुकताच एका प्रमोशन इव्हेंटधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याचत साराची तब्येत अचानक बिघडली दिसत आहे आणि कार्तिक आर्यन तिला उचलून घेऊन जाताना दिसत आहे. कार्तिक आणि साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्याच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला चाहत्याची खूपच पसंती मिळताना दिसत आहे. या व्हिडीओनुसार सारा आणि कार्तिक एक इव्हेंटसाठी जात होते मात्र यावेळी अचानक कार्तिक साराला उचलून घेतो आणि चालू लागतो. जेव्हा फोटोग्राफर्स त्याला विचारतात की त्यानं असं का केलं तेव्हा तो म्हणतो की साराची तब्येत बिघडली आहे. पण सारा मात्र हे सर्व एन्जॉय करताना दिसत आहे. Love Story : …आणि विवाहित अनुपम खेर यांना स्वप्नातली राजकुमारी अखेर सापडली!
साराच्या तब्येतीबाबत कार्तिक असंही म्हणतो की, मी मस्करी करत नाही आहे. त्यानंतर तिला तसाच प्रमोशनच्या सेटपर्यंत घेऊन जातो. सारा आणि कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सारा आणि कार्तिकचे चाहते त्यांच्या या व्हिडीओवर खूप कमेंट करताना दिसत आहेत. स्प्लिट्सव्हिला फेम मायराने टॉपलेस फोटो शेअर करत साजरा केला ‘रोज डे’ काही दिवसांपूर्वी सारा आणि कार्तिकचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात प्रमोशनमधून बाहेर पडल्यावर चाहत्यांच्या गर्दीतून बाहेर पडताना कार्तिक साराला प्रोटेक्ट करताना दिसला होता. हा व्हीडिओ अहमदाबादच्या प्रमोशनचा होता आणि कार्यक्रम संपल्यावर सारा चाहत्यांच्या गराड्यात अडकली होती. पण कार्तिकनं तिचा बॉडीगार्ड होत तिला या गर्दीतून बाहेर येण्यास मदत केली.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘लव्ह आजकल’ हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केलं असून 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘लव्ह आजकल’चा हा पुढचा भाग आहे. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो याकडे सर्वांचं लक्ष लागत आहे. लग्नाआधीच आई बनली ‘ही’ अभिनेत्री, मुलीला दिला जन्म