मुंबई, 8 फेब्रुवारी : नेहमी उठावदार भूमिका साकारणारी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपची पूर्वपत्नी अभिनेत्री कल्कि कोचलिनच्या फॅन्ससाठी खूशखबर आहे. कल्कि कोचलिन आई बनली आहे. आपल्या दमदार आणि Bold अभिनयासाठी कल्कि प्रसिद्ध आहे. सेक्रेड गेम्समधल्या भूमिकेनंतर कल्किचे फॅन फॉलोअर्स आणखी वाढले आहेत. आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा कल्किने 2019मध्ये केली होती. कल्कि बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गला गेले काही वर्ष डेट करत आहे. या दोघांच्या नात्याची चर्चा बी-टाउमध्ये गेली अनेक वर्ष रंगते आहे. दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही. हर्शबर्ग आणि कल्किला मुलगी झाल्याची बातमी Viral Bhayani ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलं आहे.
गरोदर असल्यापासून कल्किने अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले होते. त्यावेळीही तिचा Bold and Beautiful अंदाज फॅन्सना पाहायला मिळाला होता.
लग्न न करताच गरोदर राहिल्यामुळे अनेकांनी तिला प्रश्न विचारुन भांडावून देखील सोडलं होतं. मात्र सगळ्यांना वेळोवेळी योग्य उत्तर देत कल्किने सर्वांचीच मनं जिंकली होती. लवकरच ती आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करेल अशी अपेक्षा तिच्या फॅन्सना आहे.
अभिनेत्री करिना कपूरच्या ‘इश्क एफएम’ या कार्यक्रमात तिने आपल्या लग्नाआधीच्या गरोदरपणाबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी कल्किने तिचा आधीचा नवरा अनुराग कश्यप बद्दल देखील सांगितलं होतं. जेव्हा करिनाने लग्न केल्याशिवाय आई बनण्याच्या निर्णयाबाबत विचारलं होतं, त्यावर कल्किने अत्यंत मजेदार उत्तर दिलं होतं. ‘माझ्याकडे एक सुपर पॉवर आहे, मी माझा फोन स्विचऑफ करते आणि खूप वेळासाठी मी सोशल मीडियापासून दूर राहते. कमेंट्स सुद्धा नाही वाचत’
कल्किचा बोल्ड अंदाज आणि तिचा अभिनय नेहमीच सगळ्यांना आवडत आला आहे. त्याचप्रमाणे तिच्या गरोदरपणामध्येही फॅन्सनी तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आता मुलीचा जन्म झाल्यानंतर कल्कि अभिनय क्षेत्रात कसं पुनरागमन करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल