जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / स्प्लिट्सव्हिला फेम मायराने टॉपलेस फोटो शेअर करत साजरा केला 'रोज डे', फॅन्स म्हणाले 'आता Valentine Day'ची प्रतीक्षा'

स्प्लिट्सव्हिला फेम मायराने टॉपलेस फोटो शेअर करत साजरा केला 'रोज डे', फॅन्स म्हणाले 'आता Valentine Day'ची प्रतीक्षा'

स्प्लिट्सव्हिला फेम मायराने टॉपलेस फोटो शेअर करत साजरा केला 'रोज डे', फॅन्स म्हणाले 'आता Valentine Day'ची प्रतीक्षा'

Valentine Week सुरू झाला आहे आणि प्रेमी युगुलांमध्ये पूर्ण आठवडा साजरा करण्याचा खूप उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अक्टीव्ह असणाऱ्या काही सेलिब्रिटींनी देखील याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये टीव्हीवरील पॉप्युलर रिअलिटी शो असणाऱ्या ‘स्प्लिट्सव्हिला 11’ मधील स्पर्धक मायरा (Maera Mishra) हिने शेअर केलेला फोटो खूप चर्चेत आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 फेब्रुवारी : Valentine Week सुरू झाला आहे आणि प्रेमी युगुलांमध्ये पूर्ण आठवडा साजरा करण्याचा खूप उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असणाऱ्या काही सेलिब्रिटींनी देखील याबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये टीव्हीवरील पॉप्युलर रिअ‍ॅलिटी शो असणाऱ्या ‘स्प्लिट्सव्हिला 11’ मधील स्पर्धक मायरा (Maera Mishra) हिने शेअर केलेला फोटो खूप चर्चेत आला. अभिनेता शेखर सुमनचा मुलगा आणि कंगना राणावतचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमनला (Adhyayan Suman) मायरा डेट करत आहे. मायराच्या इन्स्टाग्रामवर अध्ययनसोबतचे अनेक फोटो आहेत. दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे.

जाहिरात

मायराने ‘रोज डे’च्या दिवशी आपल्या इन्स्टाग्रामवर टॉपलेस फोटो शेअर केला आहे आणि त्यावर लाखो फॅन्सनी कमेंट्स केल्या आहेत.

मायराच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतात. मायराने तिचा टॉपलेस फोटो शेअर केल्यानंतर एका फॅनने कमेंट केली आहे की, आता आम्ही Valentine Day ची वाट पाहतो आहे. नुकतच मायरा आणि अध्ययन सुमनच्या गाण्याचा व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. इन्स्टाग्रामवर मायराने अध्ययन आणि शेखर सुमन यांच्यासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. मायरा आणि अध्ययन या दोघांचे कुटुंबियांमध्ये देखील चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात