Pati Patni Aur Woh Trailer: पत्नी आणि 'ती'च्या मध्ये अडकला कार्तिक आर्यन, पाहा हा मजेशीर ट्रेलर

Pati Patni Aur Woh Trailer: पत्नी आणि 'ती'च्या मध्ये अडकला कार्तिक आर्यन, पाहा हा मजेशीर ट्रेलर

सिनेमाची कथा एक अशा इंजीनिअरची आहे जो घरच्यांच्या आवडीने लग्न करतो. सगळं काही सुरळीत सुरू असताना त्याच्या आयुष्यात 'तिची' अर्थात अनन्या पांडेची एण्ट्री होते.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर- कार्तिक आर्यन, (Kartik Aaryan) अनन्‍या पांडे (Ananya Panday) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) या त्रिकूटांचा 'पति पत्‍नी और वो' (Pati Patni Aur Woh) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सिनेमाच्या नावावरूनच सिनेमात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर दाखवण्यात आल्याचं दिसतं. कार्तिकने चिंटू त्यागी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमाचा ट्रेलर मजेशीर असून कार्तिकच्या चाहत्यांना सिनेमा रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. लुक्का छुप्पी सिनेमानंतर आपरशक्ती खुराना आणि कार्तिकची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

सिनेमाची कथा एक अशा इंजीनिअरची आहे जो घरच्यांच्या आवडीने लग्न करतो. सगळं काही सुरळीत सुरू असताना त्याच्या आयुष्यात 'तिची' अर्थात अनन्या पांडेची एण्ट्री होते. अनन्या त्याच्याच ऑफिसमध्ये काम करते. इथूनच सुरू होतं लग्न झालेल्या चिंटूच्या आयुष्यातला तारेवरची कसरत. तसं पाहायला गेलं तर याआधीही या धाटणीचे अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये येऊन गेले आहेत. पण कॉमेडीची फोडणी देण्यात आलेल्या या सिनेमाचा ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा यात काय वेगळं आहे ते...

कार्तिक, भूमी आणि अनन्या या त्रिकूटाचा हा सिनेमा येत्या 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त स्टारर 'पातीपत' (Panipat) सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. आता या दोन सिनेमांपैकी प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती देतात हे येणारा काळच सांगेल.

स्टारचा मुलगा संन्यासी होण्याच्या मार्गावर, 28 व्या वर्षी गेला ओशोच्या आश्रमात

जेव्हा हा बॉलिवूड स्टार रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना फाइव्ह स्टारमध्ये घेऊन जातो

शाहिद कपूरच्या पावलांवर पाऊल ठेवत ही अभिनेत्री करणार Arrange Marriage

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचं WhatsApp अकाउंट झालं हॅक, हॅकर करतोय अश्लील व्हिडीओ

Promo Video: जेव्हा गरिबीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलाचा मृत्यू होतो

Published by: Madhura Nerurkar
First published: November 4, 2019, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading