मुंबई, 21 जून- आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी आर्टिकल १५ सिनेमामुळे चर्चेत आहे. आर्टिकल १५ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून आयुष्मानच्या या सिनेमाची चर्चा आहे. सिनेमात समतेच्या अधिकाराबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमात उत्तर प्रदेशच्या बदायूं येथील एका घटनेवर भाष्य केलं आहे. पण आता हा सिनेमा वादात अडकला आहे.सिनेमात आयुष्मान खुराना एका पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. दोन मुलींच्या मृत्यूचं गुढ उकलण्याचा प्रयत्न करत असतो. २०१४ मध्ये बदायूं येथे दोन मुलींवर बलात्कार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. याच विषयावर सिनेमाची कथा भाष्य करणार आहे. मात्र या सिनेमाला करणी सेना आणि परशुराम सेनेकडून विरोध होताना दिसत आहे. या दोन्ही सेनेने प्रदर्शन रोकण्याची धमकी देत सिनेमात ब्राह्मण समाजाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे. Bigg Boss Marathi च्या घरातून अभिजीत बिचुकलेला अटक
प्रियांकाच्या लग्नात बूट चोरल्यानंतर निकने परिणीतीला दिले लाखो रुपये आणि… डीएनएने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अनुभव सिन्हाला सोशल मीडियावर आणि फोनवर धमक्या मिळत आहेत. याशिवाय करणी सेनेसह अन्य काही संघटनांनी मल्टीप्लेक्स मालकांना हा सिनेमा प्रदर्शित न करण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात चित्रपटगृहांचा मालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. अनुभव सिन्हाने याआधी मुल्क सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. यात तापसी पन्नू आणि ऋषी कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळीही अनुभवला विरोधाचा सामना करावा लागला होता. करणी सेनेने सिनेमाला विरोध करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी पद्मावत आणि मणिकर्णिका या दोन्ही सिनेमांना कडाडून विरोध केला होता. करणी सेनेशिवाय अखिल भारतीय ब्राह्मण एकता परिषदेने आर्टिकल १५ चे निर्माता आणि दिग्दर्शकांना नोटीस पाठवत सिनेमातील आक्षेपार्ह दृश्य हटवण्याची मागणी केली होती. येत्या २८ जूनला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होत आहे. Kangana Ranaut ने आपल्या योग गुरूला गुरुदक्षिणा म्हणून दिला फ्लॅट