प्रियांकाच्या लग्नात बूट चोरल्यानंतर निकने परिणीतीला दिले लाखो रुपये आणि...

प्रियांकाच्या लग्नात बूट चोरल्यानंतर निकने परिणीतीला दिले लाखो रुपये आणि...

priyanka chopra parineeti chopra ते लोक आमच्यापेक्षा जास्त तयारी करून आले होते. आम्हाला वाटलेलं आम्हीच हुशार आहोत.

  • Share this:

मुंबई, 21 जून- प्रियांका चोप्राने निक जोनसशी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात लग्न केलं. जोधपूरच्या उमेद भवनमध्ये दोघांनी राजेशाही थाटात लग्न केलं. आजही प्रियांकाच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एकदा परिणीतीने तिच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, तिने विधी म्हणून निकचे बूट चोरले होते. याबदल्यात तिने त्याच्याकडे तब्बल ३७ कोटी रुपये मागितले होते. यावर उत्तर म्हणून त्याने यापेक्षा दुप्पट देईन असं म्हटलं होतं. पण आता स्वतः परिणीतीने तिला निकने काय दिलं याचा खुलासा केला.

VIDEO: सुष्मिता सेनच्या घरी असा झाला नव्या नवरीचा गृहप्रवेश

उमेद भवनात तीन दिवस प्रियांकाचं शाही लग्न सुरू होतं. दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने लग्न केलं. परिणीती नुकतीच बीएफएफ वोग सीजन ३ मध्ये सानिया मिर्झासोबत पोहोचली होती. यावेळी परिणीती म्हणाली की, बूट चोरल्यानंतर निकने तिला खूप सारे रुपये आणि एक हिऱ्याची अंगठी दिली. परिणीती पुढे म्हणाली की, ‘ते लोक आमच्यापेक्षा जास्त तयारी करून आले होते. आम्हाला वाटलेलं आम्हीच हुशार आहोत. आम्ही लोकांनी त्याचे बूट चोरले आणि पैसे मागितले. ते आधीपासूनच तयारी करून आले होते. त्यांनी कोणाला तरी इशारा केला. थोड्यावेळाने एक व्यक्ती ट्रे घेऊन आला आणि त्यात खूप साऱ्या हिऱ्याच्या अंगठ्या होत्या.’

बॉलिवूड अभिनेत्रींचं फिटनेस सिक्रेट, परफेक्ट फिगरसाठी करतात या खास गोष्टी

 

View this post on Instagram

 

For flexibilty, strength and mental peace ‍♀️ I love yoga #InternationalYogaDay

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

यावेळी परिणीती म्हणाली की, ‘पीकू’ सिनेमा नाकारल्याचं तिला दुःख असल्याचंही मान्य केलं. दीपिका पदुकोणआधी या सिनेमासाठी परिणीतीला विचारण्यात आले होते. सध्या परिणीती सायना नेहवालच्या बायोपिकवर काम करत आहे.

International Day of Yoga: योगा केल्यानं मला खूप ऊर्जा मिळते- शिल्पा शेट्टी

First published: June 21, 2019, 2:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading