मुंबई, 21 जून- आज जगभरात योग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत आणि बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सारेच योग साधना करताना दिसत आहे. बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतच्या फिटनेसचं रहस्य योग साधना आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिची ओळख जुहू बीचवर एका व्यक्तिशी झाली. त्या व्यक्तिचं जिमनॅस्टिक पाहून कंगना एवढी प्रभावित झाली की तिने लगेच त्याला आपलं गुरू केलं आणि तेव्हापासून ती त्याच्याकडून योग शिकत आहे.
बॉलिवूड अभिनेत्रींचं फिटनेस सिक्रेट, परफेक्ट फिगरसाठी करतात या खास गोष्टी
कंगनाच्या या योग गुरुचं नाव सूर्य नारायण सिंह असं आहे. अभिनेत्रीने आपल्या गुरुला २ कोटी रुपयांचा २ बीएचके फ्लॅट दिला होता. मीडिया रिपोर्टनुसार, कंगनाने हा फ्लॅट नारायण सिह यांना गुरुदक्षिणेच्या स्वरुपात दिला होता. असं म्हटलं जातं की, कंगनाच्या अनेक चांगल्या वाईट दिवसांमध्ये तिच्या गुरुंनी तिची साथ कधीच सोडली नाही. सूर्यनारायण यांनी स्वतःहून कंगनाकडे काही मागितलं नाही. क्वीनने स्वतःहून त्यांना हा फ्लॅट भेट म्हणून दिला.
VIDEO: सुष्मिता सेनच्या घरी असा झाला नव्या नवरीचा गृहप्रवेश
रिपोर्टनुसार, कंगनाने आपल्या गुरुला दिलेल्या फ्लॅटमध्ये सुंदर योग सेंटर होईल यासाठी लागणारी सर्व मदत केली. याआधीही कंगनाने बहिणीला रंगोली चंडेलला तिच्या लग्नाची भेट म्हणून २ बीएचकेचा फ्लॅट भेट म्हणून दिला होता.
International Day of Yoga: योगा केल्यानं मला खूप ऊर्जा मिळते- शिल्पा शेट्टी