आलिया भट्टला वहिनी करण्यावर करिना कपूरने दिलं भन्नाट उत्तर, करण जोहरने उडवली थट्टा

आलिया भट्ट ही करीनाची फार मोठी चाहती आहे. आतापर्यंत अनेकदा तिने याचा उल्लेखही केला आहे. आलिया करीनाला तिची प्रेरणा मानते.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 04:13 PM IST

आलिया भट्टला वहिनी करण्यावर करिना कपूरने दिलं भन्नाट उत्तर, करण जोहरने उडवली थट्टा

मुंबई, 14 ऑक्टोबर- रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या नात्याबद्दल तर आता साऱ्यांनाच माहीत आहे. गेल्या वर्षभरापासून ते एकमेकांना डेट करत आहेत. बॉलिवूडमधलं हे हॉट कपल अनेक कार्यक्रमात एकमेकांसोबत फिरताना दिसतात. अशात आता रणबीर कपूरची चुलत बहीण करीना कपूर- खानला त्या दोघांच्या नात्याबद्दल एका कार्यक्रमात विचारण्यात आले. करिना आणि आलिया नुकत्याच एका कार्यक्रमात एकत्र गेल्या होत्या. यावेळी करिनाला रणबीर- आलियाच्या नात्याबद्दल विचारण्यात आले. करीनाच्या उत्तरातून हे तर स्पष्ट झालं की ती दोघांच्या नात्याबद्दल सकारात्मक असून फार उत्साहीही आहे.

आलिया आणि करीना रविवारी मुंबईत Jio MAMI Movie Mela with Star 2019 या कार्यक्रमात एकत्र दिसले. तर दिग्दर्शक करण जोहरने यावेळी दोघींना फार मजेशीर प्रश्न विचारले. संधीचा फायदा घेत करणने आलियाला विचारले की, 'तुला कधी वाटलेलं का की एक दिवस करिना कपूर तुझी नणंद होईल?' याचं उत्तर आलिया देणार इतक्यात करिनाच मध्ये बोलली की, 'मी जगातील सर्वात आनंदी मुलगी असेन.'

Loading...

करणचा हा प्रश्न ऐकताच सुरुवातीला आलिया थोडी लाजली आणि म्हणाली की, 'खरे सांगायचे तर, मी कधीही विचार केला नव्हता. बरं, मी आताही याचा विचार का करू? जेव्हा आम्ही इथे पोहोचलो आहोत, तेव्हाच आम्ही एकमेकांमधलं अंतर ओलांडलं. असं असलं तरी आलियाच्या या उत्तरानंतर करण काही गप्प बसला नाही. तो पुढे म्हणाला, 'जेव्हा हे घडेल तेव्हा करीना आणि मी खूप आनंदी होऊ आणि थाळी घेऊन तुझ्या समोर उभे राहू.'

आलिया भट्ट ही करीनाची फार मोठी चाहती आहे. आतापर्यंत अनेकदा तिने याचा उल्लेखही केला आहे. आलिया करीनाला तिची प्रेरणा मानते. दरम्यान, 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि रणबीर कपूर यांच्यात जवळीक निर्माण झाली. या चित्रपटाचं चित्रीकरण बल्गेरियात करण्यात आले. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून रणबीरचा सर्वात जवळचा मित्र अयान मुखर्जी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.

#sairatmetshadak- रिंकू-जान्हवीचा एकत्र फोटो पाहून चाहते झाले झिंगाट!

83 Film- दररोज 12 ओव्हर बॉलिंग, 200 बॉल बॅटिंग करून रणवीर सिंग असा झाला कपिल देव

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिकेच्या सेटवर रंगला क्रिकेटचा सामना, पाहा PHOTOS

मामा-भाच्यांचे असेही वैर; गोविंदामुळे कृष्णाने सोडला कपिल शर्माचा शो

लग्नापूर्वी दीपिका पदुकोणला अशा नजरेने पाहायचा रणवीर सिंग, शेअर केला PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...