मुंबई, 22 सप्टेंबर : अभिनेत्री करीना कपूर खाननं नुकताच तिचा 39 वा वाढदिवस साजरा केला. सैफ अली खानचा खानदानी राजवाडा पटौदी पॅलेसमध्ये तिनं धुमधडाक्यात वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. सैफ आणि करीना बॉलिवूडचं परफेक्ट कपल मानलं जातं. या कपलच्या लग्नाला 7 वर्षं झाली आहेत मात्र या 7 वर्षांत करीना सैफच्या एका सवयीमुळे खूप वैतागली आहे. नुकत्याच एका शोमध्ये करीनानं या गोष्टीचा खुलासा केला. याशिवाय तिनं तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी इतरही काही खुलासे यावेळी केले. टॉक शो ‘द लव लाफ लाइव्ह शो’ मध्ये करीनानं तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी बोलताना सर्व प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. करीना म्हणाली, आम्ही दोघंही खूपच सामाजिक आहोत मात्र आम्हाला फिल्मी पार्ट्या आवडत नाहीत सैफला कोणत्याही स्क्रिनिंग शोला जाणं आवडत नाही कारण त्याचं म्हणणं आहे की तो खोटं बोलू शकत नाही. त्यामुळे सैफ नेहमीच अशा ठिकाणी जाणं कटाक्षानं टाळतो. आम्ही दोघंही या इंडस्ट्रीचा एक भाग आहोत. मात्र या ठिकाणी आमचे खूप कमी मित्र आहेत. रानू मंडलनं सलमान खानच्या गाजलेल्या सिनेमातलं गायलं गाणं, नवा VIDEO VIRAL
करीना पुढे म्हणाली, सैफला वाचनाची भयंकर आवड आहे. तो बऱ्याच वेळा पुस्तकं वाचत असतो. आमचं रात्रीचं जेवणं नेहमीच लवकर होतं. 7.30 ते 8 वाजेपर्यंत आम्ही जेवतो. मात्र सैफची एक सवय खूपच वैताग आणणारी आहे. जेव्हा मी त्याला कोणतीही गोष्ट सांगते त्यावेळी त्याची पहिली प्रतिक्रिया नाही अशी असते. जेव्हा मी त्याला विचारते, सैफ तुला काय वाटतं आपण प्रत्येक पाऊल ट्राय करुन मगच टाकायला हवं का? त्यावेळी त्याचं उत्तर असतं, ‘नाही’. रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती ‘अशी’ कळतेच
करीना सैफच्या या सवयी बद्दल बोलताना पुढे सांगते, काही वेळानं तो मला अचानक फोन किंवा मेसेज करतो, ‘हो’ त्यावेळी मी त्याला सांगते की हीच गोष्ट मी तुला काही वेळापूर्वी विचारली त्यावेळी नाही का बोललास त्यावर त्याच्याकडे त्याचं उत्तर नसतं. मला वाटतो अनेकदा सहजच नाही बोलून जातो. सैफ आणि करीनाची लव्ह स्टोरी टशन सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती. यानंतर या दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. 3 वर्ष एकमेकांना डेट केल्यांनंतर करीनानं सैफशी लग्न केलं. सैफ आणि करीनाच्या वयात 10 वर्षांचं अंतर आहे. 2016मध्ये तिनं तैमुरला जन्म दिला. सध्या तैमुर सर्वाधिक लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. Dabangg 3 : सलमान खानसोबत सई मांजरेकरचा फर्स्ट लुक आला समोर, Photo Viral ==================================================================== VIDEO: ‘लफडी केली तर सहन करा’; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी