मुंबई, 22 सप्टेंबर : सोशल मीडियावर मागच्या काही काळापासून रानू मंडल यांच्या नवाची चर्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. रेल्वे स्टेशनवर गाणी गात भीक मागणाऱ्या रानू मंडल यांचा बॉलिवूड डेब्यू पर्यंतचा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. नुकतंच त्यांचं पहिलं गाणं 'तेरी मेरी कहानी' रिलीज झालं. त्यानंतर त्यांच्या नवनव्या गाण्यांचे व्हिडीओ रोज व्हायरल होत आहे. रानू असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्या सलमान खानच्या सिनेमाचं गाणं गाताना दिसत आहेत.
सोशल मीडिया सेनसेशन बनलेल्या रानू यांचा एक व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि भाग्यश्री यांचा सुपरहिट सिनेमा 'मैंने प्यार किया'मधील गाणं 'दिल दीवाना' हे गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरीही हा लेटेस्ट व्हिडीओ नाही. ज्यावेळी रानू राणाघाटच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात असे त्यावेळी तयार केलेला हा व्हिडीओ आहे. खरं तर हा व्हिडीओ युट्यूबवर ऑगस्टमध्ये शेअर करण्यात आला होता. मात्र आता रानू स्टार झाल्यानंतर त्यांचे असेच अनेक जुने व्हिडीओ नव्यानं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच
रानू यांनी आतापर्यंत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची अनेक गाणी गायली आहे. त्यांनी अनेकदा ही गोष्ट कबूल केली आहे की, लता मंगेशकर त्यांच्या प्रेरणास्थान आहेत आणि त्यांची गाणी ऐकूनच रानू यांनी गाणं गायला सुरुवात केली होती. त्यानंतर रानू यांच्या गाण्यावर खुद्द लता मंगेशकर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. एखाद्या व्यक्तीची प्रेरणा घेणं ठिक आहे. माझ्या गाण्यामुळे कुणाचं भलं होत असेल तर ही चांगली गोष्ट आहे मात्र कोणाचीही नक्कल करण्यापेक्षा माणसानं नेहमी स्वतःचं अस्तित्व शोधावं असा सल्ला लता दीदींनी दिला होता.
VIDEO : सलमान खान अजूनही कतरिनावर फिदा, भर कार्यक्रमात तिचं नाव ऐकलं आणि...
त्यानंतर लता दीदींना लोकांनी बरंच ट्रोल केलं होतं मात्र तेरी मेरी कहानीच्या लॉन्चवेळी हिमेश रेशमियानं लता दीदीच्या या सल्लावर आपली प्रतिक्रिया दिली होती. तसेच लोकांनी लता दीदींच्या बोलण्याा लोकांनी चुकीचा अर्थ घेतल्याचं तो म्हणाला होता. हिमेश म्हणाला, माझ्या मते, रानू यांना हे टॅलेंट जन्मताच मिळालं आहे. त्यांनी लताजींकडून प्रेरणा नक्कीच घेतली आहे. मात्र मला नाही वाटत की लताजींसारखं महान गायक कोणी होऊ शकेल. त्या बेस्ट आहेत. रानू यांनी आत्ताच त्यांचं करिअर सुरू केलं आहे. मला वाटतं लोकांनी लता दीदींना चुकीचं समजलं आहे. त्यांनी रानू यांना सल्ला दिला आहे की, प्रेरणा घेणं चांगली गोष्ट आहे मात्र कोणाचीही कॉपी करु नये आणि रानू यांना कोणाचा आवाज कॉपी केलेला नाही.
Oscar Award : 'अपना टाइम आ गया', भारतातून 'Gully Boy' मिळालं तिकीट
==========================================================
VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan