नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार सलमाननं स्वतः दबंग 3 साठी काही संवाद लिहिले आहेत. तसेच त्याच्या सांगण्यावरून सिनेमाच्या काही डायलॉग्समध्येही बदल करण्यात आले आहेत. सलमान नेहमीच सेटवर इनपुट्स देत असतो. ज्याचा सिनेमाच्या स्क्रिप्टमध्ये समावेश केला जातो. याशिवाय या सिनेमात तो हाय ऑक्टेन अॅक्शन सीनच्या कोरिओग्राफीमध्येही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. Oscar Award : 'अपना टाइम आ गया', भारतातून 'Gully Boy' मिळालं तिकीटView this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं. त्यानंतर चाहत्यांना या सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली आहे. हा सिनेमा हिंदी सोबतच तमिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे सलमान स्वतःच या तिन्ही भाषांमध्ये हा सिनेमा डब करणार आहे. या सिनमाचं दिग्दर्शन साउथ स्टार प्रभूदेवा करत आहे. 'दबंग 3' व्यतिरिक्त सलमानकडे 'किक 2' , 'टायगर जिंदा है सिक्वेल', 'नो एंट्री मे एंट्री' आणि 'शेरखान' हे सिनेमा आहेत. रामायणाच्या प्रश्नावरून ट्रोल झाली सोनाक्षी, आता म्हणते... ================================================================= VIDEO: 'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan