मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच

रात्रीस खेळ चाले : शेवंताच्या नवऱ्याला शेवटी धक्कादायक माहिती 'अशी' कळतेच

Ratris Khel Chale, Zee Marathi - रात्रीस खेळ चालेमध्ये एक धक्कादायक घटना घडणार आहे

Ratris Khel Chale, Zee Marathi - रात्रीस खेळ चालेमध्ये एक धक्कादायक घटना घडणार आहे

Ratris Khel Chale, Zee Marathi - रात्रीस खेळ चालेमध्ये एक धक्कादायक घटना घडणार आहे

मुंबई, 21 सप्टेंबर : रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत बऱ्याच घडामोडी घडतायत. शेवंताला अण्णांबरोबरचे संबंध तोडून टाकायचे आहेत. पण ते शक्य होत नाहीय. अण्णा पाटणकर तालुक्याला गेल्यावर तिच्या घरी येतात. शेवंता अण्णांवर रागावलेलीच आहे. इतक्यात अचानक पाटणकर येतो आणि त्याला अण्णा-शेवंताचे प्रेमसंबंध असल्याची शंका येते.

आता पुढच्या काही आठवड्यांमध्ये पाटणकर मुद्दाम मुंबईला जातोय म्हणून सांगून अण्णा आणि शेवंतावर पाळत ठेवतोय. त्यातच त्याला सुषमा त्याची मुलगी नसल्याचं कळतं. पाटणकर हादरून जातो. त्यातच अण्णा त्याला सांगतो की, तू कसा शेवंतासाठी योग्य नव्हतास. हे कळताच पाटणकरला धक्का बसतो.

VIDEO : सलमान खान अजूनही कतरिनावर फिदा, भर कार्यक्रमात तिचं नाव ऐकलं आणि...

सध्या रात्रीस खेळ चाले मालिकेतली शेवंता गाजतेय. मालिकेत अण्णा आणि तिची केमिस्ट्री चांगलीच जुळलीय. शेवंताचं काम करणाऱ्या अपूर्वा नेमळेकरनं याआधीही मालिकांमध्ये काम केलंय. पण गाजतेय ती हीच भूमिका.

अपूर्वानं झी मराठीवरच आभास हा, एकापेक्षा एक जोडीचा मामला यात काम केलं होतं. झी युवावरच्या प्रेम हे मालिकेतही ती होती. कलर्सवरच्या तू माझा सांगातीमध्येही अपूर्वाची भूमिका होती. तर स्टार प्रवाहवरच्या आराधनामध्येही अपूर्वा होती.

Oscar Award : 'अपना टाइम आ गया', भारतातून 'Gully Boy' मिळालं तिकीट

सिनेमांमध्ये इश्कवाला लव्ह आणि अगदी अलिकडचा अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरमध्येही ती होती. आलाय मोठा शहाणा, चोरीचा मामला ही नाटकंही तिनं केली.

अपूर्वा मुंबईत दादरमधलीच. किंग जाॅर्ज स्कूलमध्ये शिक्षण आणि नंतर रुपारेलमधून तिनं बीएमएसचा कोर्स केला. अभिनयात शिरण्याआधी अपूर्वा बँकेत काम करत होती आणि वडिलांच्या मॅनेजमेंट कंपनीत काम करत होती.अपूर्वा ज्वेलरी डिझायनिंगही करायची. 2015मध्ये तिचा स्वत:चा अपूर्वा कलेक्शन ब्रँडही होता.

VIDEO : निवडणुकीच्या तारखातील 'त्या' 2 दिवसावर भुजबळांनी व्यक्त केला संशय, म्हणाले...

First published:
top videos

    Tags: Ratris khel chale