मुंबई, 25 जून : अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी यांचं नाव नेहमीच चर्चेत होतं. या दोघांनी आपल्या नात्याची जाहीर कबूली कधी दिली नसली तरीही त्यांच्या नात्याविषयी सगळीकडे बोललं जात होतं. पण नुकत्याचं मिळालेल्या माहितीनुसार दिशा आणि टायगर यांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. पिंकव्हिलानं दिलेल्या वृत्तानुसार टायगर आणि दिशा आता वेगळे झाले असून त्यांच्यामध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे. प्रियांका चोप्राच्या ‘या’ जंपसूटची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क ! काही दिवसांपूर्वी दिशा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत डिनर करून येताना स्पॉट झाली होती त्यामुळे दिशा-टायगरचं ब्रेकअप या कारणासाठी झालं असं बोललं जात होतं. पण आता मात्र यामागचं खरं कारण स्पष्ट झालं आहे. टायगर आणि दिशाच्या जवळच्या सूत्रानी पिंकव्हिलाला दिलेल्या माहितीनुसार मागच्या काही दिवसांपासून या दोघांमधील नात्यात दुरावा आला होता. त्यामुळेच आता या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता ऑफिशिअली ब्रेकअप केलं असून हे नातं संपवण्याचा निर्णय या दोघांनीही परस्पर संमतीनं घेतला आहे. बॉलिवूडमध्ये फक्त हिटच नाही तर फिटही आहे सलमान खान, हा घ्या पुरावा!
या दोघांचही फ्रेंड सर्कल सारखंच असल्यानं ते दोघंही अनेकदा एकत्र दिसतात मात्र त्यांच्यामध्ये आता कोणतही रोमँटिक नातं राहिलेलं नाही. सूत्रांचं असंही म्हणणं आहे की, जर त्यांच्या रिलेशनशिपवर ते दोघंही कधी बोलले नाही तर आता ब्रेकअप काय बोलणार आहेत. काही दिवसांपूर्वीच टायगर एका रेस्टॉरंटच्या बाहेर गर्दीपासून दिशाला प्रोटेक्ट करताना दिसला होता आणि त्यांचे हे फोटो खूप व्हायरलही झाले होते.
आयुष्मानने सुरू केली ‘भंगीविरोधी’ मोहीम, सोशल मीडियावर शेअर केला हा व्हिडिओ
अभिनेत्री दिशा पाटनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनर करून येताना कॅमेऱ्यात कैद झाली होती. तेव्हापासूनच टायगर आणि दिशाच्या ब्रेकअपची कुजबूज सुरू झाली होती. पण आता यामागे आदित्य नव्हे तर दिशा आणि टायगरमधील वाद असल्याचं समजतं. त्यामुळे दिशा-टायगरच्या चाहत्यांसाठी हे वृत्त निराशजनक आहे. मागच्या काही काळापासून दिशा-टायगर आपल्या नात्याची जाहीर कबूली देतील अशी आस लावून बसलेल्या चाहत्यांना त्याआधीच ब्रेकअपचं वृत्त ऐकायला मिळालं आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
Sunny Leone आता हिंदी सोडून भोजपुरी शिकतेय सनी लिओनी, VIRAL VIDEO
===================================================================== VIDEO : भारतीय महिला हॉकी टीमचा बसमध्ये विजयी जल्लोष