करिनानं आतापर्यंत 29 लोकांना फॉलो केलेलं आहे मात्र यात साराचं नाव कुठेही नाही. तसं पाहायला गेलं तर सारा आणि करिनामधील संबंध तर चांगले आहे. या दोघी नेहमीच कोणत्याही मुलाखतीत एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. अनेकदा सारानं ती स्वतः करिनाची खूप मोठी चाहती असल्याचं अनेक मुलाखतीत सांगितलं आहे. पण आता या दोघींनीही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो न करण्याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. ‘माझं शरीर, माझी मर्जी...’ क्लिवेजवरुन ट्रोल करणाऱ्यांना रश्मी देसाईनं झापलंView this post on Instagram
साराच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सारा लवकरच 'कुली नंबर 1' च्या रिमेकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर करिना कपूरचा 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात करिना पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असून अभिनेता इरफान खान आणि राधिका मदन हे सुद्धा या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. येस बँक प्रकरणात मलायकाच्या बॉयफ्रेंडचं नाव, म्हणे 'अर्जुन कपूरमुळे बुडली बँक'View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kareena Kapoor, Sara ali khan