मुंबई, 11 मार्च : साउथची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियानं तिच्या सिनेमातून अभिनयाची छाप सर्वांवर सोडली आहे. मागच्या काही दिवसांपासून तमन्नान दिलेल्या तिच्या स्वयंवराबाबतच्या वक्तव्यानं खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत तमन्नानं जर तिचं स्वयंवर झालं तर ती कोणत्या 3 अभिनेत्यांना यासाठी बोलवणार आहे त्यांची नावं सांगितली होती. ज्यानंतर ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तमन्नाला जर तिचं स्वयंवर झालं तर ती यामध्ये कोणत्या सुपस्टार्सना बोलवणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तमन्ना म्हणाली, ‘मी माझ्या स्वयंवरासाठी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन, विकी कौशल आणि प्रभास यांना बोलवेन.’ या मुलाखतीत बोलताना तमन्ना पुढे म्हणाली, ‘मी नेहमीच ऑनस्क्रिन नो किसिंग पॉलिसी फॉलो करते. माझ्या प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये हे लिहिलेलं असतं. पण जर मला हृतिक रोशनसोबत जर एखादा सिनेमा करायला मिळाला तर मी ही पॉलिसी तोडू शकते.’ येस बँक प्रकरणात मलायकाच्या बॉयफ्रेंडचं नाव, म्हणे ‘अर्जुन कपूरमुळे बुडली बँक’
It was wonderful meeting @iHrithik. You've always inspired and continue to do. Will always cherish this moment & the photo. Super happy! pic.twitter.com/wl7hPDaEkF
— Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) October 24, 2017
तमन्ना भाटिया हृतिक रोशनची खूप मोठी चाहती आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं हृतिकची भेट घेतली होती. याबद्दल बोलताना ती म्हणाली, ‘काही दिवसांपूर्वीच मी हृतिकला भेटले. खरं तर मी जवळजवळ त्याच्यावर आदाळलेच होते. मी त्याला सांगितलं की मी तुझी खूप मोठी चाहती आहे. तुला भेटून खूप छान वाटलं. त्यावर तो मला म्हणाला, ओके. यानंतर तो चालत चालत पुढे गेला. पण काही वेळानं त्यानं मागे वळून पाहिलं आणि म्हणाला, तुला माझ्यासोबत फोटो काढायचा आहे का? मी त्याला होकार दिला.’ तमन्नानं तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जो खूप व्हायरल झाला होता. रंगोलीने चव्हाट्यावर आणली प्रायव्हेट गोष्ट, बहिणीच्या त्या ट्वीटमुळे कंगना भडकली तमन्नाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच ‘बोले चुडिया’ या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती नवाझुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. याशिवाय तिचा तेलुगू सिनेमा ‘सीटीमार’ सुद्धा लवकरच रिलीज होणार आहे. हे दोन्ही सिनेमाच याच वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. “लोक आताही मला असं म्हणतात…”, सावत्र आईच्या टॅगमुळे करीना कपूर वैतागली