मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Karan Johar :'स्टुडंट ऑफ द इयर 3' झळकणार विकी कौशल? करण जोहरने दिली मोठी हिंट

Karan Johar :'स्टुडंट ऑफ द इयर 3' झळकणार विकी कौशल? करण जोहरने दिली मोठी हिंट

करण जोहर-विकी कौशल

करण जोहर-विकी कौशल

'स्टुडंट ऑफ द इयर' हा करणचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हिट चित्रपट म्हणावा लागेल. कारण या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि वरून धवन यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता करणने चक्क 'स्टुडंट ऑफ द इयर-3' ची घोषणा करत मुख्य कलाकार कोण असणार तेही सांगून टाकलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  16 नोव्हेंबर :बॉलिवूडचा सर्वात मोठा निर्माता करण जोहर या ना त्या कारणाने कायम चर्चेत असतो. मुख्यतः बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या स्टारकिड्सना लॉंच  करण्याचं काम करण करतो. त्यामुळे त्याला अनेकदा प्रेक्षकांचा रोष सहन करावा लागतो. 'स्टुडंट ऑफ द इयर' हा करणचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हिट चित्रपट म्हणावा लागेल. कारण या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट आणि वरून धवन यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्यानंतर करणने  'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून अनन्या पांडेला चित्रपटसृष्टीत आणले पण त्याचा हा प्रयत्न मात्र फसला. आता करणने चक्क  'स्टुडंट ऑफ द इयर-3' ची घोषणा करत मुख्य कलाकार कोण असणार तेही सांगून टाकलं आहे.

चित्रपट निर्माता करण जोहरने त्याच्या इंस्टाग्रामवर अभिनेता विकी कौशलचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करण पहिल्यांदा विकीच्या आगामी 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटाविषयी बोलताना दिसत आहे, मात्र शेवटच्या व्हिडिओमध्ये करणने एक मोठा खुलासा केला आहे. व्हिडिओमध्ये तो विकीला चित्रपटाची ऑफर देताना दिसत आहे. हा साधासुधा चित्रपट नसून स्टुडंट ऑफ द इयर' चा पुढचा भाग असणार आहे.

हेही वाचा - Alia Ranbir Daughter : आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या बाळाचं नाव फायनल! ऋषी कपूरशी आहे खास कनेक्शन

करणने त्याने व्हिडिओमध्ये सांगितले आहे की तो 'स्टुडंट ऑफ द इयर-3' बनवणार आहे. यासोबत त्याने या चित्रपटातील अभिनेत्याचं नाव सुद्धा जाहीर करून टाकलं आहे. हा अभिनेता आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता विक्की कौशल.  करण-विकीचे संपूर्ण बोलणे ऐकल्यानंतर चाहते संभ्रमात पडले आहेत. आता करणला विकीसोबत 'स्टुडंट ऑफ द इयर 3' करायचा आहे का कि हा एक पब्लिसिटी स्टंट आहे  हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

व्हिडिओच्या शेवटच्या क्लिपमध्ये 'गोविंदा नाम मेरा'ची संपूर्ण कथा ऐकल्यानंतर विकी करणचा चित्रपट न करण्याचे कारण सांगतो. यावर करण खूप रागावलेला दिसतो आणि म्हणतो की मी कलाकारांना चांगले ओळखतो, तुम्ही बहाणा करत आहात. यावर करणला राग आलेला पाहून विकी म्हणतो की, 'मला तुझ्या चित्रपटात काम करायचं आहे आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. विकीचे बोलणे ऐकल्यानंतर करण त्यालाही आपल्या चित्रपटाचा भाग बनवण्यास उत्सुक आहे, म्हणून तो त्याला 'गोविंदा नाम मेरा' ऐवजी 'स्टुडंट ऑफ द इयर 3' करण्यास सांगतो. करणच्या या मोठ्या ऑफरबद्दल जाणून विकीला थोडा धक्का बसतो.' हा व्हिडीओ जरी पब्लिसिटी स्टंट असला तरी येणाऱ्या काळात विकी कौशल आणि करण जौहर नक्कीच एकत्र येणार यात शंका नाही.

2012 मध्ये आलेला करण जोहरचा 'स्टुडंट ऑफ द इयर' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाचा दुसरा भाग 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वरुण धवन यांनी चित्रपटाच्या पहिल्या भागातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तर अनन्या पांडे, आदित्य सील आणि तारा सुतारिया यांनी टायगर श्रॉफसोबत दुसऱ्या भागात पदार्पण केले. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. आता करणच्या नव्या व्हिडिओने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

First published:

Tags: Bollywood actor, Bollywood News, Karan Johar, Vicky kaushal