मुंबई, 08 जुलै- बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगना आपल्या सिनेमाला चर्चेत आणण्यासाठी नेहमीच काही ना काही करत असते. यात आक्षेपार्ह वक्तव्य करणं, घराणेशाहीचा वाद, हृतिक रोशन, आदित्य पांचोलीविरुद्धचा वाद.. असे एक ना अनेक वाद तिच्या नावाशी जोडले गेले आहेत. पण यावेळी कंगनाचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. जजमेंटल है क्या या सिनेमातील नवीन गाण्याच्या लॉन्चवेळी कंगनाचं एका पत्रकाराशी जोरदार वाद झाला. एकता कपूर, कंगना रणौत आणि राजकुमार राव त्यांच्या आगामी जजमेंटल है क्या सिनेमातील एका रीमिक्स प्रमोशनल गाण्याच्या लॉन्चला पोहोचले होते. पत्रकार परिषद सुरू असताना जस्टिन राव या पत्रकाराने आपलं नाव सांगून प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा कंगनाला जस्टिनशी निगडीत एक जुनी गोष्ट कंगनाला आठवली. मणिकर्णिका या तिच्या सिनेमाशी निगडीत जस्टिनने एक बातमी तिच्याविरुद्ध छापली होती. मग काय कंगनाने मागचा पुढचा विचार न करता जस्टिनला सर्वांसमोर सुनवायला सुरुवात केली. दोघांमधील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगनाच्या या वादामुळे पत्रकार परिषदेला एक वेगळंच वळण आलं. जस्टिन रावच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी कंगनाने त्याच्यावरच अनेक आरोप केले. जस्टिनने मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी सिनेमाबद्दल पूर्वग्रह मनात ठेवून नकारात्मक लिहिले. तसेच तिच्याबद्दलही अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या. यावर जस्टिन म्हणाला की, ‘कंगना तू माझ्यावर असे आरोप करू शकत नाही. मी जे काही लिहितो ते खरं लिहितो. तसेच मी तुझ्याबद्दल कधीही चुकीचं लिहिलेलं नाही.’ जस्टीनने अनेकदा आपलं म्हणण मांडलं तरी कंगना त्याच्यावर ओरडण्याची काही थांबली नाही. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर मणिकर्णिका सिनेमाशी संबंधीत मुलाखतीसाठी हा पत्रकार व्हॅनिटी वॅनमध्ये तीन तास थांबला होता आणि त्याने अनेकदा पर्सनल मेसेजही केले. या सर्व वादात जस्टिन अगदी शांतपणे आणि सन्मानाने एकच गोष्ट वारंवार सांगत होता की त्याने कधीही कंगनासोबत लंच केला नाही. तसेच तो तिच्या व्हॅनिटी वॅनमध्येही गेला नाही. पण कंगना त्याचं काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
यानंतर रिपोर्टरने त्याच्या ट्वीटचे आणि मेसेजचे स्क्रिनशॉट दाखवायला सांगितले. तिने जर ते मेसेज तरच तो या सर्व गोष्टी मानेल असंही जस्टीन म्हणाला. यानंतर कंगना ते मेसेज नक्की शेअर करेल असं म्हणाली. यावेळी सिनेमाची निर्माती एकता कपूर, अभिनेता राजकुमार राव, लेखिका कनिका ढिल्लन आणि दिग्दर्शक प्रकाश कोवलामुडी हेही तिथे उपस्थित होते. मलायका-अर्जुनमध्ये आता प्रेमाचा त्रिकोण, दोघांत आली तिसरी व्यक्ती आलिया भट्टच्या या खोलीत अजून होतं तरी कोण? CM योगींनंतर आता हार्ड कौरच्या निशाण्यावर अमिताभ- अक्षय, दिल्या अश्लील शिव्या VIDEO : भाजपात दाखल झाल्यानंतर सपना चौधरी म्हणते…