मुंबई, 29 जुलै : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या चित्रपटापेक्षा तिच्या वक्तवायांमुळे चर्चेत आहे. कंगना बॉलिवूडच्या कोणत्या दिग्दर्शक अभिनेत्यावर कधी आणि कसा निशाणा साधेल काही सांगता येत नाही. ती अनेकदा दिग्दर्शक-निर्माता करण जोहरला घराणेशाहीच्या वादावरून टार्गेट करते. करण जोहर सोबत तिचे बरेच वाद आहेत. ती नेहमी त्याला बॉलिवूडचा माफिया म्हणून हिणवत असते. अशातच कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या मोठ्या पडद्यावर ओपेनहाइमर, बार्बी आणि मिशन इम्पॉसिबल जोरात सुरू आहेत. कंगनाने क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपेनहाइमर’ या चित्रपटाचे कौतुक करताना करण जोहरविषयी मुक्ताफळं उधळली आहेत. तसेच यावेळी तिने अभिनेता रणवीर सिंगलाही धारेवर धरलं आहे.
कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद खूप जुना आहे हे सर्वांनाच माहीत आहे. करण जोहरला इंडस्ट्रीत नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली असून त्याने या मुहूर्तावर रॉकी और राणी की प्रेम कहाणी हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. आता हा चित्रपट रिलीज होताच, कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर करण जोहरविषयी एक पोस्ट लिहिली आहे. ‘चेहऱ्यावर सूज, वाढलेलं वजन…’ गंभीर आजाराशी झुंज देतेय अभिनेत्री; 3 वर्षांपासून मिळालं नाही काम कंगनाने लिहिले, “भारतीय प्रेक्षक अण्वस्त्रे आणि अणुविज्ञानाच्या निर्मितीवर आधारित 3 तासांचा चित्रपट पाहत आहेत आणि येथे नेपो गँग तिचं सासू सुनेची भांडण दक्खवण्यात बिझी आहे. आमच्याकडे तर डेली सोप बनवायलाच 250 कोटींची गरज भासते.” कंगनाने पुढे लिहिले की, “एकच चित्रपट अनेकवेळा बनवल्याबद्दल करण जोहरला लाज वाटत नाही का. तुम्ही स्वत:ला भारतीय चित्रपटसृष्टीचा मुख्य स्तंभ मानता. पण अश्या कलाकृती घडवत तुम्ही चित्रपटसृष्टीला मागे ढकलत आहात. कंगनाने करणला सल्ला देत म्हटलंय की, कशावरही उगाच पैसे वाया घालवू नको, इंडस्ट्रीसाठी ही चांगली वेळ नाही. रिटायर होआणि तरुण चित्रपट निर्मात्यांना चांगले चित्रपट बनवू दे.’ असं म्हणत तिने करण जोहर विषयी मार्मिक पोस्ट लिहिली आहे.
करणच्या चित्रपटात रणवीरने रॉकीची भूमिका साकारली आहे. रणवीर त्याच्या ड्रेस सेन्समुळे चर्चेत असतो. कंगनाला चित्रपटातील रणवीरचे कपडे आवडले नाहीत. तिच्या पोस्टमध्ये रणवीरला टॅग करत कंगनाने लिहिले, “माझा त्याला सल्ला आहे की त्याने करण जोहर आणि त्याच्या ड्रेसिंग सेन्समधून जरा बाहेर पडावं. जसे धरम जी आणि विनोद खन्ना जी त्यांच्या काळात कपडे घालायचे तसं त्यानेही सामान्य माणसासारखं राहिलं पाहिजे. कार्टून दिसणारा हा व्यक्ती स्वतःला हिरो म्हणवतो, जरा दक्षिणेतील सर्व नायक पहा, ते कसे वागतात.’ असं म्हणत तिने रणवीर सिंगवर देखील टीका केली आहे.