मुंबई, 04 मार्च: बॉलिवूडचा कॉमेडी किंग (Bollywood Comedy king) जॉनी लीव्हर (Johnny Lever) कोणत्याही चित्रपटात आपल्या अभिनयाने स्वतः ची एक वेगळी छाप पाडतो. गेल्या अनेक वर्षांपासून जॉनी लीव्हरने आपल्या अभिनयाच्या अनोख्या शैलीने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जॉनी मोठ्या पडद्यावर लोकांना नेहमी हसवताना दिसतो. परंतु काही वेळा तो अगदी गंभीर गोष्ट देखील अत्यंत हलक्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहचवतो. अलीकडेच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. ज्यामध्ये तो आपल्या मुलांसोबत मजेदार डान्स (Comedy Dance Video) करताना दिसत आहे. यावेळी जॉनी लीव्हर आणि त्यांच्या मुलांनी जबरदस्त डान्ससोबतच गमतीदार हावभावही दिले आहेत. शिवाय हा व्हिडीओ शेअर करताना एक विशेष संदेशही देण्यात आला आहे. जॉनी लीव्हरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची दोन्ही मुलंही जॉनीसोबत डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये जेमी लीव्हर (Jamie Lever) आणि जेस्सी लीव्हर (Jessey Lever) दोघांनी ‘डोन्ट टच मी’ (don’t touch me) या म्युझिक गाण्यावर वडिल जॉनीच्या तोडीचे हावभाव दिले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे. (हे वाचा- OTT वर पॉर्नोग्राफीचा भडीमार; सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, स्क्रीनिंग गरजेचं ) या व्हिडीओमध्ये जॉनीने चाहत्यांना शारिरीक अंतर पाळण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी जॉनीने ‘Don’t touch me’ हा हॅशटॅग वापरून व्हिडीओ शेअर केला आहे. कोरोना लस घेईपर्यंत मला स्पर्श करू नका अशा प्रकारचं आव्हान त्यांनी आपल्या मुलांना केलं आहे. या व्हिडीओमध्ये जॉनीने आपला मुलगा जेमी लीव्हर आणि मुलगी जेस्सी लीव्हरलाही टॅग केलं आहे.
(हे वाचा- उर्वशीच्या नव्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ; चाहत्यांनी केली मधुबालाशी तुलना ) कोव्हिड 19 साथीच्या रोगापासून बचाव करण्याचा संदेश देणारा हा व्हिडीओ लोकांना खूप आवडत आहे. या व्हिडिओतून जॉनीने आपल्या मजेदार डान्स व्हिडीओंद्वारे लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना लसीकरण होईपर्यंत शारिरीक अंतर पाळून स्वचः चा बचाव करण्याचा संदेश या व्हिडिओमधून दिला आहे. (हे वाचा- लांडगा आला रे आला! वरुण धवनचा हा VIDEO तुम्ही पाहिलात का? ) जेमी आणि जेस्सी दोघंही डान्ससोबतच विनोदातही निपुण आहेत. दोघंही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. पण प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी हे तिघं पहिल्यांदा एकत्र आले आहेत. त्यांच्या डान्स व्हिडीओवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.