मुंबई, 04 मार्च: बॉलीवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) लवकरचं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मोठ्या पडद्यावर परतणार आहेत. ते दोघंही त्यांच्या ‘भेडिया’ (Bhediya) या हॉरर कॉमेडी चित्रपटात (Horror Comedy Film) एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन पहिल्यांदाच वेअरवोल्फची भूमिका साकारत आहे. वरुण धवन आणि क्रिती सेननला नुकतंच मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं आहे. यावेळी क्रिती आणि वरुण खाजगी विमानाने 'भेडिया'च्या शूटिंगसाठी चालले होते. त्यांच्या नवीन चित्रपटाच्या शुटिंगसाठी दोघंही खूप उत्साही दिसत होते. क्रिती आणि वरुणचे विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेता वरुण धवनने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओही (Instagram Video) शेअर केला आहे. ज्यामध्ये तो विमानाच्या दारात उभा असून लांडग्यासारखा आवाज (Varun Dhawan makes wolf sound) काढताना दिसत आहे. वरुणच्या या व्हिडीओवर बॉलीवूडच्या अनेक कलाकरांसोबत त्याच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने इमोजी शेअर करत या व्हिडीओवर कमेंट केली आहे. आयुष्मान खुरानानेही कमेंट केली आहे. त्याने लिहिलं की, 'भेड़िया रे भेड़िया, मेरा दिल चुरा के लेई जा.'
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट पुढील वर्षी 14 एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या रिलीज तारखेबरोबरच 'भेडिया'चा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर खूपच रोमाचंक असून अनेक चाहत्यांनी याला पसंती दर्शवली होती. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
(वाचा- फोटोग्राफरच्या पायावरुन गेली वरुण धवनची कार, पाहा अभिनेत्यानं काय केलं)
'भेडिया' हा हॉरर चित्रपट युनिवर्सच्या बॅनरखाली निर्मित केला जात आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजानच्या मेडॉक फिल्म्सकडून केली जात आहे. वरुण धवन आणि क्रिती सेननचा 'भेडिया' हा चित्रपट विनोदी आणि भितीदायक गोष्टींनी परिपूर्ण भरलेला आहे. याची एक झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन 'स्त्री' आणि 'बाला' या अप्रतिम कलाकृती बनवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अमर कौशिक करत आहेत.