मुंबई 4 मार्च: उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या उर्वशीचं एक नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. हे गाणं तिनं अभिनेत्री मधुबाला (Madhubala) यांना समर्पित केलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या गाण्याला काही तासांत तब्बल ४८ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिलं आहे. यावरुनच उर्वशीच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
उर्वशीच्या या नव्या गाण्याचं नाव ‘एक लडकी भीगी भीगी सी’ (Music Video Ek Ladki Bheegi Bhaagi Si) असं आहे. खरं तर हे गाणं किशोर कुमार यांच्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटातील आहे. 70 वर्षांपूर्वी या गाण्यावर अभिनेत्री मधुबाला थिरकल्या होत्या. हे गाणं 60च्या दशकात तुफान चर्चेत होतं. त्याच गाण्याचं रिमेक वर्जन आता प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या नव्या गाण्यात मधुबालांची भूमिका उर्वशीनं साकारली आहे. दरम्यान हे गाणं तिनं मधुबाला यांना समर्पित केलं आहे.
अवश्य पाहा - उर्वशीला बॉलिवूड गायकानं घातली होती लग्नाची मागणी; का दिला अभिनेत्रीनं नकार? “बॉलिवूडच्या मर्लिन मन्रो मधुबाला यांना माझा सलाम. त्यांच्या ब्लॉगबस्टर ‘एक लडकी भीगी भीगी सी’ या गाण्यावर नाचताना खुपच आनंद होतोय. जणू लहानपणापासूनचं एक स्वप्न माझं पुर्ण झालं. त्यांचं व्यक्तीमत्व आणि सौंदर्य पाहून आश्चर्यचकित व्हायला होतं.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून उर्वशीनं मधुबाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान तिच्या या नव्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. काही तासांत 48 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

)







