जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / OTT वर पॉर्नोग्राफीचा भडीमार; सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, स्क्रीनिंग गरजेचं

OTT वर पॉर्नोग्राफीचा भडीमार; सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, स्क्रीनिंग गरजेचं

OTT वर पॉर्नोग्राफीचा भडीमार; सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, स्क्रीनिंग गरजेचं

सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) OTT प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)दाखवल्या जाणाऱ्या कंटेटबाबत चिंता व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती भूषण म्हणाले की, आजकाल ज्या गोष्टी ओटीटीवर दाखविल्या जात आहेत त्यात कधीकधी पॉर्नोग्राफीही असते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली ०४ मार्च : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) OTT प्लॅटफॉर्मवर (OTT Platform)दाखवल्या जाणाऱ्या कंटेटबाबत चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयानं म्हटलं, की काही प्लॅनफॉर्म पॉर्नोग्राफी दाखवत आहेत. ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची स्क्रीनिंग होणं गरजेचं आहे. शुक्रवारी याबाबत पुढची सुनावणी होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमच्या अपर्णा पुरोहित यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं आहे. ‘तांडव’ या वेबसीरिजमध्ये अपर्णा पुरोहित यांच्यासह अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांवर धार्मिक भावना दुखवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयानं अपर्णा पुरोहित यांची याचिका फेटाळली आहे. यानंतर अपर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायमूर्ती भूषण पुढे म्हणाले की, आजकाल ज्या गोष्टी ओटीटीवर दाखविल्या जात आहेत त्यात कधीकधी पॉर्नोग्राफीही असते. न्यायमूर्ती भूषण यांचं हे विधान केवळ तांडव या वेबसीरिजसाठी नाही, तर सगळ्याच वेबसीरिजबाबत होतं. अपर्णा यांचे वकील मुकूल रोहतगी म्हणाले, की ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी रेगुलेशन आले आहेत, मात्र, नियम अद्याप बनवले गेले नाहीत. आम्हाला रेग्युलेशनची अडचण नाही, मात्र तांडव त्याआधी बनली आहे. वेळ कमी असल्यामुळे ही सुनावणी इथेच थांबवण्यात आली. आता याप्रकरणी पुढील सुनावणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात