मुंबई, 10 जुलै- जॉन अब्राहमच्या आगामी बाटला हाउस सिनेमाचा ट्रेलर नुकतात प्रदर्शित करण्यात आला. मद्रास कॅफे आणि परमाणु- द स्टोरी ऑफ पोखरण, रॉ या सिनेमांनंतर जॉन पुन्हा एकदा सत्य घटनेवर आधारित सिनेमात काम करताना दिसणार आहे. 19 सप्टेंबर 2008 मध्ये जामिया नगर येथील बाटला हाउसमध्ये इंडियन मुजाहिद्दीनविरुद्ध करण्यात आलेल्या ऑपरेशनवर हा सिनेमा भाष्य करतो. या एनकाउंटरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला होता. तसेच या एनकाउंटरवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. बाटला हाउसमध्ये आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद या दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी ठार मारले होते. हे दोन्ही दहशतवादी इंडियन मुजाहिद्दीन संघटनेसाठी काम करत होते. ट्रेलरमध्ये जॉन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. जॉनने हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, ‘’देश पूर्वग्रहांमध्ये अडकला होता की खरंच हे एक खोटं एनकाउंटर होतं? उत्तर आता मिळेल.
सिनेमाशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाटला हाउस सिनेमात पोलिसांबद्दलची सर्वसामांन्यांच्या मनात असलेली प्रतीमा आणि योग्य एनकाउंटर असलं तरीही त्याच्या अधिकाऱ्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम दाखवण्यात आला आहे. निखिल आडवाणीने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून मृणाल ठाकुर आणि रवी किशन यांच्या मुख्य भूमिका या सिनेमात आहेत. विशेष म्हणजे जॉन आणि निखिल या सिनेमाचे सह-निर्मातेही आहेत. जॉनने या सिनेमात संजीव कुमार यादव या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पण याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा साहो सिनेमा आणि खिलाडी कुमारचा मिशन मंगल सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी तीन सिनेमे प्रदर्शित होणार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवेल हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल जर मला तिकीट मिळालं नाही तर तुलाही देणार नाही, दोघीही नॉमिनेट होऊ- वीणा जगताप World Cup- New Zealand विरुद्ध जिंकू, पण World Cup 2019 मध्ये होईल पराभव SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

)







