Batla House Teaser- ‘तब तक यही जंग जारी रहेगी.. ये बाजी कभी ना तुम्हारी रहेगी’

'आम्ही नाही म्हणत ते विद्यार्थी नव्हते.. पण म्हणून काय ते निर्दोष होते?'

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 04:34 PM IST

Batla House Teaser- ‘तब तक यही जंग जारी रहेगी.. ये बाजी कभी ना तुम्हारी रहेगी’

मुंबई, 08 जुलै- जॉन अब्राहमच्या आगामी बाटला हाउस सिनेमाच्या पहिल्या टीझरनंतर आता दुसरा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 19 सप्टेंबर 2008 मध्ये जामिया नगर येथील बाटला हाउसमध्ये इंडियन मुजाहिद्दीनविरुद्ध करण्यात आलेल्या ऑपरेशनवर हा सिनेमा भाष्य करतो. येत्या 10 जुलैला सिनेमा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमात जॉन संजीव कुमार यादव या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ऑपरेशन बाटला हाउस या नावानेच हे प्रकरण आजपर्यंत ओळखले जाते. अक्षय कुमारच्या पावलांवर पाऊल ठेवत जॉनही फार निवडक सिनेमांमध्ये काम करताना दिसतो. जॉनचा याधीचा परमाणू सिनेमाही राष्ट्रीय मुद्यावर आधारितच होता. एवढंच नाही तर याआधी आलेला मद्रास कॅफे सिनेमा पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येच्या घटनाक्रमावर आधारित होता.

दुसऱ्या टीझरची सुरुवात तब तक यही जंग जारी रहेगी.. या गाण्याने होते तर दुसरीकडे नागरिक आंदोलन करताना दिसत आहेत तर काही मंत्री आणि पोलिसांना दोष देत सगळ्यांचे एकमेकांसोबतचे लागेबंध असल्याचा आरोप काही नागरिक करताना दिसत आहे. दरम्यान, टीझरच्या शेवटी एका खिडकीतून बाहेर चाललेलं आंदोलन पाहत असणाऱ्या जॉनचा आवाज ऐकू येतो. यावेळी तो 'आम्ही नाही म्हणत ते विद्यार्थी नव्हते.. पण ते म्हणून का यते निर्दोष होते?'

एअरलिफ्ट सिनेमाचा दिग्दर्शक निखिल आडवाणीने बाटला हाउसचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. पण याच दिवशी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा साहो सिनेमा आणि खिलाडी कुमारचा मिशन मंगल सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी तीन सिनेमे प्रदर्शित होणार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवेल हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

‘माझ्याविरुद्ध लिहितोस..’ भर पत्रकार परिषदेत रिपोर्टरवर भडकली कंगना रणौत

Loading...

जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो

मलायका-अर्जुनमध्ये आता प्रेमाचा त्रिकोण, दोघांत आली तिसरी व्यक्ती

VIDEO : भाजपात दाखल झाल्यानंतर सपना चौधरी म्हणते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...