मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बॉयकॉट आणि अटकेच्या चर्चेत बिनधास्तपणे पार्टीत डान्स करताना दिसली कंगना; VIDEO व्हायरल

बॉयकॉट आणि अटकेच्या चर्चेत बिनधास्तपणे पार्टीत डान्स करताना दिसली कंगना; VIDEO व्हायरल

सध्या देशभरातून कंगनाविरोधात टीका केली जात आहे, आणि पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या मागणीचा जोर असताना दुसरीकडे कंगना सर्व विसरून नाचताना दिसत आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 13 नोव्हेंबर : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना नाचताना दिसत आहे. सध्या देशभरातून कंगनाविरोधात टीका केली जात आहे, आणि पद्मश्री पुरस्कार परत घेण्याच्या मागणीचा जोर असताना दुसरीकडे कंगना सर्व विसरून नाचताना दिसत आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

अनेक राजकीय नेते आणि सोशल मीडियावरुन तिच्या अटकेची मागणी केली जात आहे. इतकच नाही तर नेटकऱ्यांनी तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी करीत आहेत. मात्र कंगनावर या सर्वांचा काहीच परिणाम होत नसल्याचं दिसत आहे. या वादादरम्यान ती बिनधास्त पार्टी करताना आणि मित्रांसह डान्स करताना दिसत आहे. कंगनाने यासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Kangana was seen dancing at the party without any hesitation in the discussion of boycott and arrest VIDEO VIRAL)

कंगना रणौत शुक्रवारी आपल्या आगामी सिनेमा तेजसच्या टीमसह पार्टीत सामील झाली. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच (Kangana Ranaut) आपल्या बेधडक वक्तव्यामुळे अडचणीत सापडत असते. अलीकडेच तिने भारतीय स्वातंत्र्याविषयी (India's Freedom) केलेल्या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर जोरदार टीका होत असून, तिचा पद्मश्री पुरस्कार (Padamshree Award) काढून घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

या मागणीमुळे संतापलेल्या कंगनाने यावर स्पष्टीकरण दिलं असून, 1947 मध्ये काय घडलं हे कोणी सांगितलं तर आपण पद्मश्री पुरस्कार परत करू, असं तिनं म्हटलं आहे.

First published:

Tags: Bollywood, Kangana ranaut, Padma award