मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Saqib Salim मुलींचे कपडे घालून जायचा लग्नात; हुमा खुरेशीनं सांगितला भन्नाट किस्सा

Saqib Salim मुलींचे कपडे घालून जायचा लग्नात; हुमा खुरेशीनं सांगितला भन्नाट किस्सा

साकिबला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. तो अभिनयासाठी इतका उत्सुक असायचा की अगदी बहिणीचे कपडे घालून स्त्री पात्र साकारायला देखील तो मागेपुढे पाहात नसे.

साकिबला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. तो अभिनयासाठी इतका उत्सुक असायचा की अगदी बहिणीचे कपडे घालून स्त्री पात्र साकारायला देखील तो मागेपुढे पाहात नसे.

साकिबला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. तो अभिनयासाठी इतका उत्सुक असायचा की अगदी बहिणीचे कपडे घालून स्त्री पात्र साकारायला देखील तो मागेपुढे पाहात नसे.

मुंबई 8 एप्रिल: साकिब सलीम (Saqib Saleem) हा बॉलिवूडमधील सध्याच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवर मुझसे फ्रेंडशीप करोगे, रेस, ढिशूम, दिल जंगली यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानं आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज साकिबचा वाढदिवस आहे. (Saqib Saleem birthday) 33 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. साकिबला लहानपणापासूनच अभिनयाची प्रचंड आवड होती. तो अभिनयासाठी इतका उत्सुक असायचा की अगदी बहिणीचे कपडे घालून स्त्री पात्र साकारायला देखील तो मागेपुढे पाहात नसे. पाहूया काय होता तो गंमतीशीर किस्सा...

साकिबची बहिण हुमा खुरेशी (Huma Qureshi) ही देखील बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अलिकडेच या भाऊ-बहिणीनं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. (The Kapil Sharma Show) त्यावेळी एकमेकांचे बालपणीचे किस्से सांगताना हुमानं साकिबचा हा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली, “साकिबला अभिनयाची प्रचंड आवड होती. अर्थात त्याचा अभिनय तो सोडून इतर कोणाला आवडत नसे. पण त्यामुळं त्याचा उत्साह मात्र बिलकूल कमी होत नसे. तो शाळेत, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, कौटुंबिक कार्यक्रम लग्न सोहळे वगैरे अशा ठिकाणी अभिनय करुन आपली हौस भगवत असे. विशेष म्हणजे तो अभिनयासाठी इतका वेडा होता की मिळेल ती भूमिका साकारायची तयारी त्याची असे. त्यामुळं अनेकदा त्याच्याकडून स्त्री पात्र साकारुन घेतलं जायचं. अशा वेळी तो माझे कपडे चोरायचा अन् त्या भूमिका साकारायचा. एकदा तर तो माझे कपडे घालून लग्नात देखील आला होता.”

अवश्य पाहा - कामासाठी स्टुडिओसमोर तासंतास बसायचा; आमिरमुळं बदललं अमित त्रिवेदीचं आयुष्य

साकिबनं 2011 साली मुझसे फ्रेंडशिप करोगे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर मेरे डॅड की मूर्ती, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्यानं लहानमोठ्या भूमिका सकारल्या. दरम्यान त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती वरुण धवनच्या ढिशूम या चित्रपटामुळं. या चित्रपटात त्यानं भारतीय क्रिकेट कर्णधाराची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी समिक्षकांनी त्याचं प्रचंड कौतुक केलं होतं.

First published:

Tags: Actor, Birthday celebration, Bollywood, Bollywood News, Saqib saleem, The kapil sharma show