मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कामासाठी स्टुडिओसमोर तासंतास बसायचा; आमिरमुळं बदललं अमित त्रिवेदीचं आयुष्य

कामासाठी स्टुडिओसमोर तासंतास बसायचा; आमिरमुळं बदललं अमित त्रिवेदीचं आयुष्य

आमिरमुळं बदललं अमित त्रिवेदीचं आयुष्य; घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या गायकाला स्टारकिडनं दिली होती पहिली संधी

आमिरमुळं बदललं अमित त्रिवेदीचं आयुष्य; घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या गायकाला स्टारकिडनं दिली होती पहिली संधी

आमिरमुळं बदललं अमित त्रिवेदीचं आयुष्य; घराणेशाहीवर आरोप करणाऱ्या गायकाला स्टारकिडनं दिली होती पहिली संधी

मुंबई 8 एप्रिल: अमित त्रिवेदी (Amit Trivedi) हा बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध संगीकार म्हणून ओळखला जातो. ‘नमो नमो’, ‘नैना दा कसूर’, ‘लव्ह यु झिंदगी’, ‘लगन लागी रे’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांची निर्मिती करणारा अमित एक अष्टपैलू गायक आणि संगीतकार म्हणून ओळखला जातो. (Versatile Singer Musician) तो आपल्या सुरेल गाण्यांच्या जोरावर जपळपास एक दशक रसिकांचं मनोरंजन करत आहे. आज अमितचा वाढदिवस आहे. 42 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (National Film Award for Best Music Direction) आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला अमित कधीकाळी एका गाण्यासाठी स्टुडिओंसमोर तासंतास बसून राहायचा. या हरहुन्नरी गायकचं नशीब बदललं ते अभिनेता आमिर खानमुळं. पाहूया काय होता तो किस्सा...

अमितचा जन्म 8 एप्रिल 1979 साली मुंबईतील एक गरीब कुटुंबात झाला होता. त्याला लहानपणापासून गाण्याची आवड होती. तो गणेशोत्सव, दिवाळी, नवरात्रीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन आपल्या गाण्याची हौस पुर्ण करत असे. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यानं संगीतक्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानं काही गाण्यांची निर्मिती देखील केली होती. पण करिअरच्या सुरुवातीस त्याची गाणी ऐकून घ्यायला देखील कोणी तयार नव्हतं. तो तासंतास रेकॉर्डिंग स्टुडिओसमोर बसून राहायचा पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. अशा परिस्थितीत अभिनेता आमिर खाननं त्याला मदत केली.

अवश्य पाहा - मालिका संपताच चिन्मय मांडलेकरचा 'जीव झाला येडापिसा'; निरोप घेताना केली भावुक पोस्ट

अमितची गाणी ऐकून आमिर इतका प्रभावित झाला की त्यानं त्याला सधी देण्याचा निश्चय केला. अमिरनं त्याला राज कुमार गुप्ता यांच्याकडे पाठवलं. एका थ्रिलरपटासाठी त्यांना बॅकग्राऊंड स्कोअरची गरज होती. शिवाय त्यासाठी त्यांच्याकडे बजेटही कमी होता. त्यामुळं आमिरच्या सांगण्यावरुन त्यांनी अमितला संधी दिली. या चित्रपटासाठी त्यानं एकूण सहा गाण्यांची निर्मिती केली. चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण गाणी मात्र रसिकांमध्ये लोकप्रिय ठरली. त्यानंतर अनुराग कश्यपनं त्याला देवडी या चित्रपटासाठी गाणी तयार करण्यास सांगितली. अन् तेथूनच अमितच्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. लक्षवेधी बाब म्हणजे अमिरच्या सांगण्यावरुन त्याला ज्या चित्रपटात सर्वप्रथम संधी मिळाली त्या चित्रपटाचं नाम आमिरचं होतं. थोडक्यात काय तर आमिरमुळं अमित प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला.

First published:
top videos

    Tags: Aamir khan, Amit trivedi, Bollywood, Entertainment, National film awards, Singer