मोहन भागवत आणि योगी यांच्याविरुद्ध बोलणं पडलं भारी, हार्ड कौरविरुद्ध गुन्हा दाखल

मोहन भागवत आणि योगी यांच्याविरुद्ध बोलणं पडलं भारी, हार्ड कौरविरुद्ध गुन्हा दाखल

Mohan Bhagwat Yogi Adityanath Hard Kaur हार्ड कौरने मोहन भागवत यांना फक्त जातीयवादी म्हटलं नाही तर आतापर्यंत भारतात २६/११, पुलवामा यांसारखे जेवढे हल्ले झाले त्याला आरएसएस जबाबदार असल्याचं म्हटलं.

  • Share this:

मुंबई, 20 जून- आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिलेल्या गायिका हार्ड कौरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या यूकेमध्ये राहणारी पंजाबी गायिका कौरने आदित्यनाथ यांचा फोटो शेअर करत त्यांना ‘बलात्कारी’ आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना दहशतवादी म्हटलं होतं.

आता या प्रकरणी वाराणसी पोलीस ठाण्यात हार्ड कौरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वकील शशांक शेखर त्रिपाठी यांनी पोलिसांना या प्रकरणी लेखी तक्रार नोंदवली. नोंदवलेल्या तक्रारीनुसार या पोस्टमुळे सामान्य जनमानसाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शशांक यांच्या तक्रारीवर कॅन्ट पोलिसांनी कलम १५३ ए, १२४ ए, ५००, ५०५ आणि ६६ आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

नक्की काय आहे हे प्रकरण- 'शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंत सगळ्याच्या मागे RSS'

हार्ड कौरने मोहन भागवत यांना फक्त जातीयवादी म्हटलं नाही तर आतापर्यंत भारतात २६/११, पुलवामा यांसारखे जेवढे हल्ले झाले त्याला आरएसएस जबाबदार असल्याचं म्हटलं. याआधीही कौरवर वेगवेगळ्या सेलिब्रिटी, राजकीय नेते यांच्यावर टीका केल्या आहेत. पण आता योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांच्यावर टीका करणं तिला चांगलंच महाग पडलं आहे. सोशल मीडियावर तिला फैलावर घेतलं जात असून अनेकजण तिची शाळा घेत आहेत.

कौरने तिच्या पोस्टमध्ये अश्लिल भाषेचाच उपयोग केलान ही तर ज्या लोकांनी या पोस्टवर कमेंट केली. त्यांनाही हार्ड कौरने शिवीगाळ केली आहे. एकीकडे अनेकांनी तिला या पोस्टवरून सुनावलं आहे तर काहींनी तिचं कौतुकही केलं आहे.

या स्टार कपलने ४० दिवस साजरं केलं हनिमून, प्रेग्नंसीच्या प्रश्नावर दिलं उत्तर

VIDEO : सेटवर घुसून कलाकारांना रॉडने मारहाण, माही गिलला दुखापत

First published: June 20, 2019, 9:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading