या स्टार कपलने ४० दिवस साजरं केलं हनिमून, प्रेग्नंसीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं भन्नाट उत्तर
samantha ruth prabhu या दोघांच्या लग्नाची चर्चा संपूर्ण भारतात होती. डेस्टिनेशन वेडिंग करत दोघं आजही अनेकदा त्यांच्या चाहत्यांना कपल गोल देत असतात.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि नागा चैतन्यची पत्नी समंथा रुख प्रभू सध्या तिच्या प्रेग्नसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून समंथा गरोदर असल्याच्या चर्चा तमिळ आणि तेलगू सिनेसृष्टीत होत होत्या.

या चर्चांवर समंथाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण वाढत चाललेलं गॉसिप पाहून अखेर तिने आपली बाजू मांडली. ट्विटरवरून समंथाने तिच्या चाहत्यांना मीडियाला उत्तर दिलं.

सोशल मीडियावर एका युझरने तू गरोदर आहेस का असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला रीट्वीट करत समंथाने लिहिले की, मला नाही माहीत. पण जर तुम्हाला कळलं तर मला नक्की सांगा असं उपहासात्मक उत्तर दिलं.

समंथाच्या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिचा ओह बेबी सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातील ओह बेबी हे गाणं फार प्रसिद्ध झालं होतं.

अनेक दिवस हे गाणं ट्रेण्डमध्येही होतं. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान समंथाने तिच्या ट्विटर अकाउंटचं नाव बदलून बेबी अक्कीनेनी असं केलं होतं. यानंतरच तिच्या चाहत्यांमध्ये समांथा गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली होती.
Tags:
First Published: Jun 19, 2019 02:28 PM IST