जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंत सगळ्याच्या मागे RSS- हार्ड कौर

शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंत सगळ्याच्या मागे RSS- हार्ड कौर

शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून ते दहशतवादी हल्ल्यापर्यंत सगळ्याच्या मागे RSS- हार्ड कौर

hard kaur, rss जागे व्हा, तुम्ही अजून तुमच्या बहिणींवर आणि मुलींवर बलात्कार होण्याची वाट पाहत आहात का?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 जून- भारतात आतापर्यंत जेवढे दहशवातवादी हल्ले झाले त्या सर्व हल्ल्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे, एवढंच नाही तर शिवाजी महाराजांच्या हत्येलाही आरएसएसचं जबाबदार असल्याचं धक्कादायक वक्तव्य गायिका आणि रॅपर हार्ड कौरने केलं आहे. एवढं बोलून कौर थांबली नाही तर तिने या देशात संघाला काम करण्याचा काहीही अधिकार नसल्याचं तिने सांगितलं. गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केल्यानंतर सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी आणली होती, असंही ती म्हणाली. हार्ड कौरने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मोहन भागवत यांचा फोटो शेअर करत तिने संघावर आगपाखड केली. हेही वाचा-  Bigg Boss Marathi 2- आईसमान सुरेखांबद्दल अभिजीतनी नेहाला सांगितलं असं काही ‘मुंबईतील २६/११ हा दहशतवादी हल्ला असो किंवा पुलवामा हल्ला देशात आतापर्यंत जेवढे दहशवादी हल्ले झाले त्या सर्वाला आरएसएस कारणीभूत असल्याचं तिने म्हटलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या जातीयवादी पक्षाने अनेकांचे बळी घेतले. ईशान्य भारताची दुर्दशाही संघानेच केली असा आरोप कौरने केला. गौतम बुद्ध आणि महावीर हे महान व्यक्ती या विचारधारांच्याविरुद्ध लढले. आता यापुढे संघाला सहन केलं जाणार नसल्याचं विधानही तिने या पोस्टमधून केलं.

जाहिरात

हेही वाचा-  ‘माझी फिगर पाहा,’ आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने भाजपच्या महिला नेत्या भडकल्या आपल्या पोस्टच्या शेवटी तिने लोकांना आवाहन करन म्हटलं की, जागे व्हा, तुम्ही अजून तुमच्या बहिणींवर आणि मुलींवर बलात्कार होण्याची वाट पाहत आहात का? की ते तुमच्यावर हल्ला करण्यासाठीच तुम्ही थांबला आहात? तिच्या या संपूर्ण पोस्टमध्ये तिने फक्त संघावर ताशेरे ओढत अश्लील भाषेचाही वापर केला. याआधीही हार्ड कौरने हेमंत करकरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा ठपका संघावर ठेवला होता. हार्ड कौरही बॉलिवूडमधील रॅपर आणि गायिका असून तिच्या नावावर अनेक प्रसिद्ध गाणी आहेत. पण गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडमधून गायब आहे. सध्या ती चर्चेत येण्यासाठी या सर्व गोष्टी करत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. हेही वाचा-  लग्नाआधी गरोदर राहिली अभिनेत्री, रस्त्यावरच केलं असं काही की लोक झाले हैराण VIDEO: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात का होतेय ट्रोल?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात