मुंबई, 25 फेब्रुवारी : बिग बॉस हा टीव्ही वरील सर्वात वादग्रस्त शो मानला जातो. काही दिवसांपूर्वीच या शोचा 13 वा सीझन संपला. हा सीझन बराच चर्चेतही राहीला. या घरातील प्रेम, भांडण यासोबतच चर्चा झाली ती घरात भूत असल्याची. एका एपिसोडमध्ये दाखवण्यात आलं होतं की स्पर्धक विशाल आदित्य सिंह काहीतरी विचित्र हावभाव करत आहे. एका रात्री त्यानं अचानक उठून काहीतरी बडबड करत घरात काही हालचाली पाहिल्याचं सांगितलं होतं. ज्यात मधुरिमानं सुद्धा त्याला समर्थन दिलं होतं. त्यानंतर आता घरातून बाहेर पडल्यानंतर विशालनं याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. बिग बॉसच्या घरात खरोखरच भूत आहे अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे. मागच्या काही सीझनमध्येही याविषयी बोललं गेलं होतं. पण यावेळी एकाच नाही 2-3 स्पर्धकांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे. बिग बॉसच्या घरात असताना काही स्पर्धकांनी घरात काही तरी विचित्र घडत असल्याचं म्हटलं होतं. काहीतरी वेगळ अनुभवल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. नुकत्याच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखातीत विशालनं या गोष्टीचा पुनरुच्चार केला. मी बराच काळ गावात काढल्यानं मी या गोष्टींवर थोडाफार विश्वास ठेवतो असं त्यानं सांगितलं. बिपाशा बासूनं पतीसोबत स्विमिंग पूलमध्ये केला रोमान्स, KISS करतानाचे फोटो व्हायरल
विशाल म्हणाला, बिग बॉसचं घर झपाटलेलं आहे. हे फक्त मला एकट्यालाच वाटलं नाही तर आसिम रियाज, आरती सिंह, रश्मी देसाई यांनाही वाटलं. माझ्यासोबत काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे मला विश्वास वाटला की या जागेत नक्कीच काहीतरी आहे. या शिवाय शहनाझ गिलचा भाऊ शाहबाझला सुद्धा असा अनुभव आल्याचं त्यानं सांगितलं होतं. तसेच हिमांशी खुराना सुद्धा एकदा घाबरली होती. #MeToo चळवळीनंतर तनुश्री करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक, डान्सचा धमाकेदार VIDEO VIRAL बिग बॉसच्या घरात भूत आहे असं सांगणारा विशाल आदित्य सिंह हा पहिलाच स्पर्धक नाही. त्यानं घरात असतानाही अनेकदा घरात भूत असल्याचं म्हटलं होतं. याशिवाय इतर स्पर्धकांनीही घरात विचित्र घटाना घडल्याचा अनुभव अल्याचं म्हटलं होतं. तसेच बिग बॉस 12 च्या स्पर्धक सबा आणि सोमी खान यांनीही आसपास काहीतरी अघटीत घडत असल्याचं म्हटलं होतं. क्रिकेटपटूशी लग्न करणार का? या प्रश्नावर पहिल्यांदाच अनुष्कानं दिलं उत्तर

)







