मुंबई, 25 फेब्रुवारी : बॉलिवूडमध्ये Me Too चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता आता सर्वांच्याच परिचयाची आहे. मागच्या वर्षी तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्या विरोधात विनयभंगाचा आरोप करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र नाना पाटोकर यांना या प्रकरणात क्लिन चीट मिळाली. यावेळी या काहींनी तनुश्रीची साथ दिली तर काहींनी तिच्यावर टीकाही केली. यासोबतच बॉलिवूड अनेक अभिनेत्री त्यांच्यावर झालेल्या अत्याचारांबाबत उघडपणे बोलू लागल्या. मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूड आणि ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहिलेली तनुश्री लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार अशी चर्चा आहे. अशातच आता तिचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
तनुश्री दत्ताचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यात ती धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. यावरुन असा अंदाज लावला जात आहे की ती लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. हे व्हिडीओ तनुश्रीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी महाशिवरात्रीच्या निमित्तानं एका कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. यावेळी तिनं अनेक बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला. त्या कार्यक्रमातील हे व्हिडीओ आहेत.
प्रियांका चोप्राच्या घरी पडली होती IT विभागाची धाड, उघडला होता शाहिदनं दरवाजा
View this post on Instagram
तनुश्रीचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. काही दिवसांपासून तनुश्री तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत असून तिनं पूर्वीपेक्षा वजन कमी केलं आहे. अद्याप तिनं कोणत्याही सिनेमाची अधिकृत घोषणा केली नसली तरीही लवकरच ती एखाद्या सिनेमात दिसली तरीही नवल नाही. साऊथ सिनेमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तनुश्रीनं 2010 मध्ये शेवटचा सिनेमा केला होता. त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायब झाली.
खिलाडीच्या चाहत्यांना खुशखबर... सूर्यवंशी होतोय या तारखेला रिलीज
बॉलिवूडपासून बराच काळ दूर असलेली तनुश्री दत्ता सोशल मीडियावर मात्र खूप सक्रीय आहे. ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती एक ग्लॅमरस फोटोशूट करताना दिसली होती.
सोहा अली खानच्या मुलीने काय केलं पाहा, VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'How Sweet'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Tanushree dutta