मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /क्रिकेटपटूशी लग्न करणार का? या प्रश्नावर पहिल्यांदाच अनुष्कानं दिलं उत्तर

क्रिकेटपटूशी लग्न करणार का? या प्रश्नावर पहिल्यांदाच अनुष्कानं दिलं उत्तर

 बाहुबली फेम अनुष्का शेट्टी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत असते.  काही दिवसांपूर्वी अनुष्का एका क्रिकेटपटूसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या होत्या. याबाबत आता अनुष्कानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

बाहुबली फेम अनुष्का शेट्टी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अनुष्का एका क्रिकेटपटूसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या होत्या. याबाबत आता अनुष्कानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

बाहुबली फेम अनुष्का शेट्टी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अनुष्का एका क्रिकेटपटूसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या होत्या. याबाबत आता अनुष्कानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : बाहुबली फेम अनुष्का शेट्टी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत असते. बाहुबलीमध्ये प्रभाससोबत झळकल्यानंतर या दोघांच्या नात्याबाबत अनेक चर्चा झाल्या, मात्र दोघांनी यात तथ्य नसल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी अनुष्का एका क्रिकेटपटूसोबत लग्न करणार असल्याच्या बातम्या होत्या. याबाबत आता अनुष्कानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

दक्षिण भारतात नावाजलेली अनुष्का क्रिकेटपटूसोबत लग्न करणार अशा बातम्या आल्यामुळं अनेकांचे प्रेमभंग झाले होते. हा क्रिकेटपटू उत्तरेकडील राज्याचा होता, अशी माहिती होती. मात्र त्याच्या नावाबाबत गोपनियता पाळण्यात आली होती. आता मात्र अनुष्कानं हा सगळ्या अफवा असल्याचे सांगितले. 'तामिळ मुरासू'च्या वृत्तानुसार अनुष्कानं मिडियावरही टीका केली आहे. काहीही बोलण्यापूर्वी किमान त्याविषयी खात्री करुन घ्या, अशा शब्दात अनुष्काने टीका केली. त्यानंतर आणखी एक मुलाखतीदरम्यान अनुष्काने लग्नाविषयी बरंच बोललं गेलं, बोललं जाईलही. पण मी माझ्या लग्नाचा निर्णय हा पालकांवरच सोडला असल्याचं तिनं सांगितले.

वाचा-'तान्हाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम, 46 दिवसांनंतर एवढी आहे कमाई

नुकतीच अनुष्का शर्मा 'निशब्धम' या सिनेमातून लोकांच्या भेटीला आली. हा सिनेमा सायलेंट थ्रिलर होता, लोकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला. 21 फेब्रुवारी 2020 रोजी हा सिनेमा  प्रदर्शित झाला.

वाचा-प्रियांका चोप्राच्या घरी पडली होती IT विभागाची धाड, उघडला होता शाहिदनं दरवाजा

हे आहे अनुष्काच्या फिटनेसचे राज

काही दिवसांपूर्वी अनुष्का शेट्टी आपल्या वाढलेल्या वजनामुळं चर्चेत होती. एवढंच नाही तर तिनं वजन कसं कमी करावं याविषयीचं एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाचं नाव 'द मॅजिक वेट लॉस पिल' असं आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अनुष्का शेट्टी सोबत तिचा न्यूट्रीशियन ल्यूक काउटीनोचा फोटो छापला आहे. या पुस्तकाची प्रस्तावना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टीनं लिहिली आहे. या पुस्तकामध्ये फिटनेस संबंधी 62 उपाय सांगण्यात आले आहेत. वजन कसं कमी करावं यासोबतच या पुस्तकामध्ये काही आजारांवरील उपायही सांगण्यात आले आहेत. 'द मॅजिक वेट लॉस पिल' या आपल्या पुस्तकाचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबतच तिनं तिच्या स्लिम फिट लुकचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या लुकवर तिचे चाहते खूश असून ते तिला आता वजन कमी करण्याचे उपाय विचारत आहेत.

वाचा-खिलाडीच्या चाहत्यांना खुशखबर... सूर्यवंशी होतोय या तारखेला रिलीझ

First published:

Tags: Anushka Shetty, Bahubali, Bahubali 2, Prabhas